Video; कडक सुरक्षा व्यवस्था मोबाईलला बंदी, तरीही विकी-कतरिनाच्या वेडिंग व्हेन्यूचा व्हिडीओ व्हायरल

December 07, 2021 , 0 Comments

जयपूर । गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशलच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. अनेक दिवसांपासून ते दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत. यामुळे चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली होती. अखेर आता हे लग्न पार पडत आहे.

आता आजपासून संगीताने विवाहसोहळ्याची सुरुवात होणार आहे. त्यानंतर 8 डिसेंबरला मेहेंदी आणि 9 डिसेंबरला शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. यामुळे या लग्नात हे दोघे कसले कपडे घालणार हे लग्न कसे होणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

विकी आणि कतरिनाने शाही विवाहसोहळ्याआधी कोर्ट मॅरेज केले असल्याचे म्हटले जात आहे. सवाई माधोपूरच्या किल्ल्यामध्ये विकी आणि कतरिनाचा लग्न सोहळा पार पडणार आहे. असे असताना आता विकी आणि कतरिनाच्या वेडिंग व्हेन्यूचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

याबाबत कडक सुरक्षा व्यवस्था असताना मोबाईल बंदी असताना देखील हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चा सुरू झाली आहे. विकी आणि कतरिनाच्या वेडिंग व्हेन्यूच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये काही लोक जोधा अकबर गाण्यातील ‘ख्वाजा मेरे ख्वाजा’ या गाण्यावर डान्स करत आहेत.

असे असताना अनेकांना प्रश्न पडत आहे की, विकी आणि कतकरिनाच्या लग्नामध्ये इतके नियम आणि कडेकोट बंदोबस्त असूनही हा व्हिडीओ व्हायरल कसा झाला? त्यामुळे हा व्हिडीओे खरच विकी आणि कतरिनाच्या वेडिंग व्हेन्यूचा आहे का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कतरिना आणि विकीच्या लग्नात पाहुण्यांसाठी काही खास नियम आणि अटी ठेवण्यात आल्या आहेत. त्यांच्या लग्नात मोबाईल फोन न वापरण्याची अट ठेवली आहे. तसेच या लग्नातील फोटो किंवा व्हिडिओ कुठेही शेअर करायची परवानगी देखील नाही.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: