बँकेसाठी इच्छुक असलेल्यांना अजितदादांचा दम, म्हणाले ना स्वत:ला कर्ज मिळेल, ना नातेवाईकाला

December 07, 2021 , 0 Comments

बारामती । राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्पष्ठ बोलण्यासाठी ओळखले जातात. आता त्यांनी बँकेच्या निवडणूकीत इच्छुक असणारांना एकप्रकारे दमच दिला आहे. बारामती बँकेवर जे संचालक म्हणून निवडून येतील त्यांनी स्वतःसाठी बँकेतून कर्ज घ्यायचे नाही आणि नातेवाईकांना देखील कर्ज घेऊन द्यायचे नाही, असे म्हटले आहे.

तसे असेल तरच निवडणुकीली उभा राहा, असे अजित पवारांनी आज उमेदवारांना म्हटले आहे. याबाबत ते बोलत होते. दि बारामती सहकार बँकेची पंचवार्षिक निवडणूक आहे. 15 जागांसाठी जवळपास राष्ट्रवादीच्या पॅनेल कडून 85 पेक्षा जास्त अर्ज आले आहेत.

यामुळे इच्छुकांची संख्या खूप मोठी आहे. यामुळे अजित पवारांनी जर संचालक म्हणून निवडून आलात तर स्वतःसाठी आणि नातेवाईकांना बँकेतून कर्ज घेऊन देता येणार नाही. जर तसे असेल तरच बँकेच्या संचालक पदासाठी उभे राहा, असे म्हटले आहे.

अनेक ठिकाणी संचालकच आपल्या पदाचा गैरवापर करतात. ते आपल्या संबंधितांना कर्ज उपलब्ध करून देतात. तसेच स्वतः देखील कर्ज घेतात. यामुळे राज्यातील अनेक जिल्हा बँका तोट्यात आल्या आहेत. तर काही बँका बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

तसेच नातेवाईकांना दिलेल्या कर्जाचा परतावा होत नसल्याने वेळोवेळी सत्ताधाऱ्यांकडून या बँकांची कर्ज माफ केली जातात. याचा फायदा हा संचालकांना आणि राजकारणाला होत असला तरी यामध्ये ठेवी असलेल्या सर्वसामान्य ठेवीदारांचे मात्र नुकसान होत आहे.

यामुळे यावर आता अजित पवारांनी तोडगा काढला आहे. यामुळे आता हा नियम किती संचालक पाळणार हे येणाऱ्या काळात समजणार आहे. यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: