….तर त्यांची नावं जाहीर करा; मनसेचं नाराज रूपाली पाटील ठोंबरेंना जाहीर आव्हान

December 16, 2021 , 0 Comments

नेत्या रूपालीताई ठोंबरे यांनी मनसेला रामराम ठोकला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना त्यांनी पत्र लिहून राजीनामा दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्या मनसेवर नाराज असल्याच्या दिसत होते. अनेकदा त्यांनी आपली नाराजी व्यक्तही केली होती.

त्यांनी राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. रूपाली ठोंबरेंनी एक पत्र लिहून राजीनामा दिला आहे. एकीकडे पुणे महापालिकेसाठी मनसे तयारी करत असताना रूपाली ठोंबरेंनी राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपुर्वीच रूपाली पाटील यांनी पक्षातील अंतर्गत वादामुळे नाराजी व्यक्त केली होती.

रुपाली ठोंबरे यांच्या जाण्याने मनते नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहे. संदीप देशपांडे यांच्यानंतर आता मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ठोंबरेंच्या जाण्याने मनसेला काही मोठं खिंडार पडलेलं नाही, असे वसंत मोरे यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनापक्षांर्तग कलहातून प्रदेश उपाध्यक्ष रुपाली ठोंबरे यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर रुपाली ठोंबरेंनी राजकीय आत्महत्या केली आहे. मनसेला त्यांच्या जाण्यानं काही मोठं खिंडार पडलेलं नाही, असे वसंत मोरे यांनी म्हटले आहे.

तसेच पक्षातील रिकामटेकड्या लोकांकडून आपल्याला त्रास होतोय असे वक्तव्य रुपाली ठोंबरे यांनी केले होते. त्याबाबत बोलताना, पक्षातील रिकामटेकड्या नेत्यांकडून आपल्याला त्रास होतोय, अशी टीका रुपाली ठोंबरे यांनी केली होती, पण रिकामटेकडे कोण हे त्यांनी एकदा जाहीर करावं असे आव्हानही वसंत मोरे यांनी केले आहे.

रुपाली ठोंबरेंना राजीनामा द्यायचाच होता. हा सगळा त्यांचा प्रीप्लॅन होता. येत्या महापालिका निवडणूकात मनसेची तादक दिसेल. पक्षांतर्गत वादाचा विषय मी स्वत: राज ठाकरे आणि शर्मिला वहिणींसमोर मिटवला होता, असेही वसंत मोरे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा भयानक अनुभव, म्हणाली, मला स्तन आणि कंबर…
रुपाली ठोंबरे यांनी मनसेला का ठोकला रामराम? खरे कारण आले समोर
उर्फी जावेदचा घायाळ करणारा व्हिडीओ आला समोर! चालु व्हिडीओतच केले पॅंटचे बटन बंद; पहा व्हिडीओ


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: