धक्कादायक! धुळ्यातील व्यक्तीच्या खिशात फुटला OnePlus Nord 2, झाली ‘अशी’ अवस्था
धुळे । गेल्या काही दिवसांपासून स्मार्ट फोनचे स्फोट होण्याचे प्रमाण वाढले आहे. आता सुहित शर्मा नावाच्या धुळ्यातील एका व्यक्तीच्या खिशातच स्मार्टफोनचा स्फोट झाला. याचे गंभीर परिणाम झाले असून व्यक्तीने ट्विट करत कंपनीविरोधात संताप व्यक्त केला आहे. तो थोडक्यात बचावला असून फोन आणि पॅन्टच्या चिंधड्या झाल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी OnePlus स्मार्टफोनमध्ये अचानक झालेल्या स्फोटामुळे चर्चेत होता. आता पुन्हा एकदा अशाच प्रकाराने फोनची मोठी चर्चा आहे. OnePlus Nord 2 एखाद्या बॉम्बप्रमाणे फुटल्याची घटना नुकतीच घडली आहे. या व्यक्तीने ट्विटरवर ब्लास्टचे काही फोटो शेअर केले आहेत.
यामुळे कंपनी आता काय निर्णय घेणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. One plus ही एक आघाडीची कंपनी म्हणून जगभरात ओळखली जाते. सुहित शर्मा यांनी चार फोटो ट्विट केले आहेत. यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांनी OnePlus कडून अशी अपेक्षा नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच कंपनीकडे तक्रार करत त्यांनी तुमच्या प्रोडक्टमुळे मुलाची काय गंभीर परिस्थिती झाली आहे पाहा. परिणामांसाठी तयार राहा. लोकांच्या आयुष्याशी खेळणं बंद करा, असे म्हटले आहे. यामुळे आता ते कायदेशीर कारवाई करण्याची शक्यता आहे.
तुमच्यामुळे मुलगा मोठ्या समस्येत आहे. लवकरात लवकर संपर्क करण्याचे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे. फोन पूर्णपणे जळाला आहे. फोन खालच्या बाजूने पूर्णपणे फुटला आहे. फोनचा ब्लास्ट झाला त्यावेळी त्याच्या व्यक्तीच्या खिशात हा फोन होता.
अचानक स्फोट झाल्याने हा व्यक्ती भयभीत झाला होता. व्यक्तीच्या मांडीला अतिशय गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याभागातील संपूर्ण त्वचा जळाली आहे. आम्ही अशा घटना अतिशय गंभीरपणे पाहातो. आमची टीम युजरपर्यंत पोहोचली आहे आणि पुढील तपासासाठी डिटेल्स जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे कंपनीने म्हटले आहे.
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: