मोठी बातमी! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘या’ आजाराने त्रस्त, दोन दिवसांत होणार शस्त्रक्रिया
मुंबई । गेल्या काही दिवसांपासून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मान आणि मणक्याचा आजाराने त्रस्त आहेत. यामुळे ते कुठे बाहेर दौरे देखील करत नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या पाठीचा मणका आणि मानेच्या स्नायूच्या दुखापतीचा त्रास सुरु झाला आहे. यामुळे कार्यकर्ते देखील चिंतेत आहेत.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांवर येत्या दोन ते तीन दिवसांत महत्वाची शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती मिळत आहे. काही दिवसांपासून याची चर्चा होती. गिरगावमधील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती देखील मिळत आहे.
डॉ. शेखर भोजराज हे मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रिया करणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे. यामुळे पुढील काही दिवसात ते कुठे दौरे देखील करणार नाहीत. इतर मंत्री आणि मुख्य सचिव राज्याचा कारभार चालवणार आहेत. उद्धव ठाकरे यांना मागील काही दिवसांपासून मणका आणि मानेच्या स्नायूंचा त्रास होत आहे.
त्यांनी गिरगावातील सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी केली होती. तसेच यावेळी त्यांनी काही शारीरिक चाचण्या केल्या आहेत. याचे रिपोर्ट देखील आले आहेत. यामुळे ही शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून हा त्रास जाणवत असल्यामुळे ठाकरे यांनी भेटीगाठी टाळल्या आहेत. ते कुठे बाहेर देखील गेले नाहीत. त्यांनी दिवाळीनिमित्त वर्षाबंगल्यावर पाहुण्यांकडून शुभेच्छा घेणेदेखील टाळले होते. तसेच लांबचे दौरे केले नाहीत.
असे असताना त्यांचा हा त्रास कमी होताना दिसत नाही. त्यामुळे पुढील उपचारासाठी मुख्यमंत्र्यांना काही दिवस रुग्णालयात दाखल व्हावे लागण्याची शक्यता आहे. यामुळे आता इतर नेते देखील विचारपूस करत आहेत.
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: