‘फडणवीसांनी स्वतःवरील आरोप झाकण्यासाठीच मलिकांचे प्रकरण बाहेर काढले’

November 10, 2021 , 0 Comments

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री नवाब मलिक चर्चेत आहेत. असे असताना त्यांनी फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे आता फडणवीस यांनी देखील त्यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांचे संबंध थेट अंडरवर्ल्डशी असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी पुरावे देखील दिल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणात आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उडी घेतली आहे. याबाबत त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

ते म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मलिकांनी जमीन घेतल्याची माहिती होती. त्यावेळी त्यांनी हे प्रकरण समोर का आणले नाही. स्वतःचं प्रकरण दाबण्यासाठी त्यांनी मलिकांचे प्रकरण काढले. आपल्या त्या प्रकरणावरून लक्ष हटविण्यासाठी दुसरी माहिती द्यायची.

आपल्यावर झालेले आरोप दाबण्यासाठी फडणवीसांनी हे सगळं केले आहे. मुख्यमंत्रिपदावर असताना फडणवीस यांनी कारवाई का केली नाही?’ असा प्रश्नही आंबेडकरांनी विचारला आहे. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे. आता फडणवीस त्यांना काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्डशी संबंधीत आणि १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपींकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप फडणवीसांनी केला. आता मलिक आक्रमक झाले असून ते म्हणाले, फडणवीसांचे फटाके फुसके निघाले. मी उद्या सकाळी १० वाजता देवेंद्र फडणवीसांच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनचा हायड्रोजन बॉम्ब टाकणार असल्याचे सांगितले आहे.

फडणवीस साहेब, माफी न मागण्याच्या मतावर ठाम राहा, उद्या मुलीची नोटीस येईलच, असेही ते म्हणाले. शहरामध्ये देवेंद्र फडणवीसांचे जवळचे लोक प्लॉट हडपण्याचे धंदे कुठल्या अधिकाऱ्याच्या मार्फत करत होते, याची माहिती उद्या १० वाजता देणार, असेही ते म्हणाले.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: