लय भारी!! छोट्या वारकऱ्याच्या डान्सचे होतेय राज्यात कौतुक, पाहा व्हिडीओ

November 10, 2021 , 0 Comments

अनेक लहान मुलांच्या अंगात वेगवेगळ्या कला असतात, याच्या अनेक व्हिडिओ देखील व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लहान मुलाचा हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस पडला आहे. यामुळे या मुलाचे कौतुक केले जात आहे. वारकऱ्यांचा हा व्हिडिओ आहे.

यामध्ये आपल्या मायबाप विठ्ठलाचे नामस्मरण करताना आपल्याला अनेक छोटे वारकरी आणि त्यांचे मोठे वारकरी बंधू भगिनी सुध्दा दिसून येतात. तरीही वयाने लहान आणि तरुण वयाच्या वारकऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात दिसून येते जी एक कौतुकाची बाब आहे.

आपले वय जास्त असले तर कला जपायकची आणि लहान असल्यापासूनच कला शिकायची हे यातून दाखवून दिले आहे. हे सगळेजण एका मोकळ्या जागेत रिंगण घालून बसलेले असतात, तर काही जण उभे असतात. तर मध्यभागी एक छोटे वारकरी दादा आणि त्यांचे मोठे सहकारी दिसून येतात.

यात टाळ आणि मृदुंग यांची अप्रतिम साथ लाभलेली आहे. मधल्या काळात या दोन्ही माऊलींच्या खेळकर नृत्यामुळे आनंद होतोच. सरतेशेवटी जेव्हा मोठे दादा आपल्या लहानग्या सहकाऱ्याला म्हणजेच छोट्या माउलींना उचलून घेतात, तो क्षण भावून जातो.

यामुळे अनेकांनी हा व्हिडिओ बघून त्यांचे कौतुक केले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. अगदी नैसर्गिकरित्या त्या गंधात बुडून हा डान्स केला गेला आहे. यामुळे आपली परंपरा अजूनही असल्याची जाणीव होते.

सध्याच्या काळात आपली संस्कृती परंपरा कमी होत चालली आहे. असे असताना हा व्हिडिओ एकप्रकारे आपल्याला एक वेगळा संदेश देखील देऊन जातो. यामुळे यावर अनेकांनी प्रतिक्रिया देऊन या छोट्या कलाकाराला अक्षरशः डोक्यावर घेतले आहे.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: