केंद्राच्या मदतीमुळे कोरोना गेला, नाहीतर घरकोंबड्या ठाकरे सरकारच्या सल्ल्यानुसार कोमट पाण्यावर…

November 26, 2021 , 0 Comments

महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून विरोधी पक्षातील नेते सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर सतत टीका करताना दिसून येत आहे. अशात भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या खासदार हीना गावित यांनीही ठाकरे सरकारवर टीका केली आहे. कोरोना सारख्या आजारातून महारष्ट्र केंद्रामुळेच वाचू शकले असे हीना गावित यांनी म्हटले आहे.

गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हीना गावितने ठाकरे सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रातील जनतेनं दिलेल्या जगादेश धुडकावून फसवणूकीने सत्तेवर आलेल्या ठाकरे सरकारने कोरोना काळात भ्रष्टाचार धोरणलकवा आणि ढिसाळपणामुळे महाराष्ट्राला कडेलोटाच्या खाईत लोटले. त्यामुळे कोरोनाविरोधी लढ्यातील सर्वात अपयशी म्हणून महाराष्ट्राची नोंद झाली आहे, असे हीना गावित यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारने वेळोवेळी केलेल्या मदतीमुळेच महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यातून सावरु शकला अन्यथा घरकोंबड्या ठाकरे सरकारच्या सल्ल्यानुसार कोमट पाणी पिऊन कोरोनाविरोधातील केविलवाणी झुंझ सुरुच राहिली असती, असा टोलाही हीना गावित यांनी लगावला आहे.

कोरोना काळात मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याची जोरदार स्पर्धा सुरु होती. भ्रष्ट कारभारामुळेच महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना मृत्यु, सर्वाधिक रुग्णसंख्या, सर्वाधिक संसर्गदर आणि सर्वाधिक लुबाडणूक झाली व हजारो लोकांना नाहक प्राण गमवावे लागले, अशी टीका हीना गावित यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

केंद्र सरकारकडून वेळोवेळी कानपिचक्या मिळणूही भ्रष्टाचार सुरुच राहिल्याने महाराष्ट्राची आर्थिक स्थिती खालावली व सत्ताधाऱ्यांच्या गोतावळ्याने मात्र संधीची चांदी करुन घेतली. प्रत्येक अपयशावर पांघरुन घालत केंद्र सरकारकडे बोट दाखवणाऱ्या ठाकरे सरकारला या काळात गरीबांसाठी मिळालेली मदतही लाभार्थींपर्यंत पोहचविण्यात अपयश आल्यामुळे असंख्य कुटुंबावर उपासमारीची वेळ आली, असा आरोपही हीना गावित यांनी केला आहे.

कोविड काळात मंत्रालयातून पळ काढून घरात कोंडून घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडून संकटाशी सामना करण्याची जबाबदारीही नागरिकांवरच ढकलली. या अपयशास मी जबाबदार असे नागरिकांकडून वदवून घेताना माझे कुटुंब एवढीच माझी जबाबदारी असा बेजबाबदार बाणाही दाखविला, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-
आयकर विभागाचा सरकारी शिक्षकावर छापा! सापडली सोन्याची बिस्किटे आणि कोट्यावधी रुपये
आंदोलकांनी तुटेपर्यंत ताणू नये, उद्यापर्यंत कामावर या नाहीतर.., अनिल परबांचा कठोर कारवाईचा इशारा
मुख्यमंत्र्यांचा मुलगाही सुशांत सिंग हत्या प्रकरणात सहभागी होता, त्यामुळेच…; नारायण राणेंचा गंभीर आरोप


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: