इन्कम टॅक्सच्या रडारवर गृहमंत्री? वळसे पाटलांच्या जवळच्या सहकाऱ्याच्या आॅफीस व घरावर छापे

November 26, 2021 , 0 Comments

आयकर विभागाच्या एका पथकाने आज पहाटे सव्वा दोन वाजेच्या सुमारास मंचर येथील पराग डेअरीवर छापा टाकला. तर दुसऱ्या पथकाने अवसरी येथील पीर डेअरीवर पहाटे साडेतीनच्या सुमारास छापा टाकला. त्यानंतर तिसऱ्या पथकाने आज सकाळी सात वाजता थेट देवेंद्र शहा यांच्या निवासस्थानी छापा टाकला. तर चौथा छापा हा देवेंद्र शहा यांच्या मित्राच्या घरी सकाळी नऊ वाजता टाकल्याची माहिती आहे. आयटीकडून कार्यालयांची देखील झडती सुरु आहे.

पुण्यात उद्योजकांवर आयकर विभागाने धाड टाकण्याची ही दुसरी वेळ आहे. विशेष म्हणजे धाड टाकलेले पराग शहा हे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. आंबेगाव मंचर येथील या धाडींमुळे संपूर्ण राज्याचे लक्ष पुण्याच्या ग्रामीण भागाकडे वेधले गेले आहे.

आयकर विभागाची छापेमारी ही सध्या सुरुच आहे. एका प्रसिद्ध उद्योजकाच्या घरावर आयकर विभागाकाने छापेमारी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आयकर विभागाने आतापर्यंत शहा यांच्या पराग मिल्क उद्योग समुहावर छापेमारी केली आहे.

आयकर विभागाच्या चार पथकांकडून वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई सुरु आहे. विशेष म्हणजे पराग मिल्क आणि गोवर्धन उद्योग समुहाचे दुध उत्पादनात जगभरात जाळं आहे. अवसरी येथील पीरसाहेब डेअरीचे पराग मिल्कसोबत काही व्यवहार आढळून आल्याने कारवाई सुरु असल्याचे बोलले जात आहे.

ताज्या बातम्या
केंद्राच्या मदतीमुळे कोरोना गेला, नाहीतर घरकोंबड्या ठाकरे सरकारच्या सल्ल्यानुसार कोमट पाण्यावर…
आयकर विभागाचा सरकारी शिक्षकावर छापा! सापडली सोन्याची बिस्किटे आणि कोट्यावधी रुपये
विराटच्या जागी संधी मिळालेल्या मुंबईकर खेळाडूची पदार्पणातच धडाकेबाज खेळी; होतय कौतूक
मुख्यमंत्र्यांचा मुलगाही सुशांत सिंग हत्या प्रकरणात सहभागी होता, त्यामुळेच…; नारायण राणेंचा गंभीर आरोप


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: