आयकर विभागाचा सरकारी शिक्षकावर छापा! सापडली सोन्याची बिस्किटे आणि कोट्यावधी रुपये

November 26, 2021 , 0 Comments

शिक्षक म्हंटल की डोळ्यासमोर उभी राहते ती शिस्तबद्ध आणि कडक व्यक्तिमत्व असलेली प्रतिमा. आतापर्यंत फक्त सरकारी खात्यात मोठ्या प्रमाणावर काळा पैसे कमावला जातो हे ऐकून होतो. मात्र शिक्षक देखील काळा पैसा कमावू शकतो हे तुम्हाला सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही. परंतु हे खरं आहे. आयकर विभागाने चक्क एका गुरुजींवर छापा टाकून मोठं गभाड जप्त केलं आहे. नीरज कुमार शर्मा असे या गुरुजींचे नाव आहे.

नीरज कुमार यांनी नोकरीच्या आठ वर्षांत जमविलेली संपत्ती पाहून तुमचे देखील डोळे गरगरतील. पाटन्यातील बहादुरपूर एसबीआय शाखेत त्याच्या नावे एक लॉकर होते. या लॉकरमध्ये १ कोटी कॅश, २५० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या ४ विटा आणि अन्य कागदपत्रे देखील मिळाली आहेत. आपल्यावर छापा पडताच घाबरलेल्या गुरुजींनी हा पैसा आपला नसल्याचे म्हटले आहे. बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील मध्य विद्यालयातील ही एक घटना आहे.

भावावर फाडले बिल
हा पैसा माझा मावस भाऊ राजद आनंदचा आहे असे गुरुजींचे म्हणणे आहे. त्याची कंस्ट्रक्शन कंपनी नवरचना आहे. या कंपनीत संचालक म्हणून आपण बिना वेतनावर असल्याचे म्हटले आहे. या संपत्तीचा मालक तोच आहे.

गुरुजींना सापडलेली रक्कम आणि सोने या बाबतची कोणतीही कागदपत्रे जमा करता आलेली नाहीत. पुढील एका महिन्याच्या आत त्यांना सर्व कागदपत्रे जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र गुरुजींकडे सापडलेल्या या खजान्याची चर्चा सर्वदूर होताना दिसत आहे.

ताज्या बातम्या
आंदोलकांनी तुटेपर्यंत ताणू नये, उद्यापर्यंत कामावर या नाहीतर.., अनिल परबांचा कठोर कारवाईचा इशारा
विराटच्या जागी संधी मिळालेल्या मुंबईकर खेळाडूची पदार्पणातच धडाकेबाज खेळी; होतय कौतूक
यशवंतराव चव्हाणांनी मुख्यमंत्रीपद पणाला लावले म्हणून आपण मोफत शिकतोय, वाचा ‘ती’ सत्य घटना..
लग्नाची विचित्र जाहिरात सोशल मिडीयावर व्हायरल, ब्रा आणि कंबरेची सांगितली साईज, नेटकरी भडकले   


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: