मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडीच वर्षांनी राजीनामा देणार? आघाडीच्या बड्या नेत्याने केला खुलासा

November 26, 2021 , 0 Comments

ठाकरे सरकारने नुकतीच आपल्या कार्यकाळाची २ वर्षे पूर्ण केली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीच्या समस्या निर्माण झाल्यापासून अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यानुसार राज्याचा मुख्यमंत्री बदलणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. आता या चर्चांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी पूर्णविराम दिला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

या सरकारचा कालखंड पाच वर्षांचा आहेत त्याच्या मनात शंका नाही, तसेच कुणीही किती खेचाखेची केली तरी सरकार पडणार नाही असे संजय राऊत यांनी या मुलाखतीदरम्यान ठणकावून सांगितले. तसेच मुख्यमंत्री बदलणार अशा पुड्या कोण सोडतो हे मला माहित नाही असे देखील राऊत यावेळी म्हणाले.

नेमकं काय म्हणाले राऊत यावेळी
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले तेव्हाच्या प्रक्रियेमधील मी एक साक्षीदार आहे.
कुणाच्या डोक्यात कल्पना नव्हती. तेव्हा निकाल सुरू असताना मी शरद पवारांकडे जाऊन असं होऊ शकतो असं सांगितलं.
तेव्हा काय चर्चा झाल्या हे मला माहिती आहे.
शरद पवार यांनी राज्याचे नेतृत्व उद्धव ठाकरे पूर्ण वेळ करणार असं स्पष्ट केलं होतं.
या सरकारचा कालखंड पाच वर्षांचा आहेत त्याच्या मनात शंका नाही, तसेच कुणीही किती खेचाखेची केली तरी सरकार पडणार नाही.

भविष्यकाळात देखील सेनेचा हाच फॉर्म्युला असणार का असा प्रश्न संजय राऊत यांना विचारला असता ते म्हणाले पुढचं मी सांगू शकत नाही परंतु उद्धव ठाकरे आपला कार्यकाळ पूर्ण करतील. एवढेच नाही तर शिवसेनेचा मुख्यमंत्री राज्यामध्ये दीर्घकाळ काम करेल आणि उद्धव ठाकरे आपला ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील.

उद्धव ठाकरे सध्या रुग्णालयात उपचार घेत असल्यामुळे अडीच वर्षानंतर मुख्यमंत्री बदलणार का या चर्चाना खोडून काढत खासदार संजय राऊत यांनी यावेळी विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला.

ताज्या बातम्या
मंदिर तोडणाऱ्याला तोडण्याची वेळ आलीय, कल्याणमधील भाजप आमदाराचे वादग्रस्त विधान
केंद्राच्या मदतीमुळे कोरोना गेला, नाहीतर घरकोंबड्या ठाकरे सरकारच्या सल्ल्यानुसार कोमट पाण्यावर…
विराटच्या जागी संधी मिळालेल्या मुंबईकर खेळाडूची पदार्पणातच धडाकेबाज खेळी; होतय कौतूक
मुख्यमंत्र्यांचा मुलगाही सुशांत सिंग हत्या प्रकरणात सहभागी होता, त्यामुळेच…; नारायण राणेंचा गंभीर आरोप   


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: