२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी ४५ जागा जिंकेल, संजय राऊतांचा दावा

November 26, 2021 , 0 Comments

मुंबई । राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून अनेक निवडणूकीत त्यांनी मोठे यश मिळवले आहे. ही महाविकास आघाडी होण्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठी भूमिका बजावली होती. आता या महाविकास आघाडीला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. यावेळी संजय राऊत यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

एका मुलाखतीत संजय राऊत यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात काय परिस्थिती असेल यावर त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत काँग्रेससह महाविकास आघाडी होण्यात मला काहीच अडचण वाटत नाही. असेही त्यांनी म्हटले आहे.

हे तिन्ही पक्ष एकत्र लढले तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ४८ पैकी ४५ जागा मिळतील, असा अंदाज देखील त्यांनी व्यक्त केला आहे. यामुळे आता निवडणूकीत काय होणार हे तेव्हाच समजेल. २०२४ मध्ये महाविकास आघाडीचेच मॉडेल दिसेल यात मला काही अडचण दिसत नाही.

काँग्रेससह महाविकास आघाडी होईल यामध्येही मला काही अडचण येईल, असं वाटत नाही. आज काँग्रेसची एकच जागा आहे. जर एकत्र लढलो तर काँग्रेसलाही लाभ होईल. त्यांच्या एकच्या पाच जागा होतील. मात्र प्रत्येकाने संयम आणि मर्यादा ठेवल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले.

तसेच राज्याचे पूर्णवेळ नेतृत्व उद्धव ठाकरेच करणार आहेत. याबाबत शरद पवार यांनी तेव्हाच ही गोष्ट स्पष्ठ केली आहे. यामुळे अशा पुड्या कोण सोडतो मला माहिती नाही. या सरकारचा कालखंड पाच वर्षांचा आहेत त्याच्या मनात शंका नाही.

तसेच कुणीही किती खेचाखेची केली तरी सरकार पडणार नाही, याउलट हे सरकार अधिकच घट्ट होईल. असेही ते म्हणाले. यामुळे आता २०२४ च्या निवडणूकीत काय चित्र असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: