एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला मोठे यश, ‘त्या’ अधिकाऱ्यास झोपेतून उठवा; न्यायालयाचे सरकारला निर्देश
मुंबई । राज्यात सध्या एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल झाले. अनेकांनी या संपला पाठिंबा दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे संपाचे हे प्रकरण आता न्यायालयात पोहोचले असून न्यायालयानेही सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
याबाबत कर्मचारी संघटनांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्यासंदर्भातील शासन निर्णय करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे त्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे.
असे असताना सरकारकडून सांगण्यात आले की, सरकारचे एक अधिकारी अमेरिकेत किंवा कुठल्या देशात आहेत, तिथे रात्र असू शकते. त्यावर, त्यांना उठवा आणि लोकांचा जीव गेलेल्या या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घ्या, यााबतची बैठक झाली पाहिजे, असे आदेशच न्यायालयाने दिले आहेत.
आज महामंडळातले 90 टक्के कामगार कामावर हजर नव्हते. तसेच आत्तापर्यंत 35 कर्मचारी बांधवांनी आत्महत्या केल्या आहेत. यामुळे कर्मचारी आक्रमक झाले आहेत. त्यांची दिवाळी सुध्दा झाली नाही. आता आंध्र आणि तेलंगणात सरकारने कामगारांना सेवेत सामावून घेतले, त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे सरकारने काम केले पाहिजे.
निर्णय होईपर्यंत आम्ही संप सुरूच ठेवणार आहे. यामुळे हा निर्णय कधी होणार आणि कधी प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत विरोधक देखील आक्रमक झाले असून सरकारवर टीका करत आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आर्यन खानची सुटका व्हावी, म्हणून नवाब मलिक आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत बैठक घेतात. मात्र त्यांना आता वेळ नसल्याची टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: