ड्रग्ज प्रकरणात आता हिंदुस्तानी भाऊंची उडी, नवाब मालिकांना दिला इशारा
मुंबई । गेल्या काही दिवसांपासून राज्यात ड्रग्ज प्रकरण चांगलेच गाजत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री नवाब मलिक हे रोज पत्रकार परिषदेत अनेक धक्कादायक खुलासे करत आहेत. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात नवाब मलिक आक्रमक झाले आहेत. यामुळे वानखेडे विरुद्ध मलिक असा वाद रंगला आहे.
भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या संरक्षणामुळे राज्यात ड्रग्सचा धंदा चालत असल्याचा गंभीर आरोप मलिकांनी केला. सध्या नवाब मलिक आणि भाजपा युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. यामुळे चर्चा सुरू आहे.
मलिकांनी मोहित कंबोज यांच्यावर ११०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. यामुळे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना सध्या रंगत आहे. याबाबत आर्यन खान अपहरण आणि वसुलीचा मास्टरमाईंड मोहित कंबोज असल्याचा दावा मलिकांनी केला आहे.
Bharat Mata Ki Jai !
Jai Hind ! #DrugFreeIndia pic.twitter.com/3MmcSLZcNy— Mohit Bharatiya ( Mohit Kamboj ) (@mohitbharatiya_) November 7, 2021
आता या प्रकरणात आता सोशल मीडियातील प्रसिद्ध चेहरा हिंदुस्तानी भाऊ उतरला आहे. हिंदुस्तानी भाऊनं मोहित कंबोज यांच्या पाठिंब्यासाठी व्हिडीओ बनवला आहे. यामध्ये मोहित कंबोज तुम्ही खूप चांगले काम करत आहात. तुम्ही नशेडी, गंजेडी लोकांविरोधात तुम्ही जे आंदोलन उभं केले आहे. जे पाऊल उचललं आहे त्याच्या सपोर्टसाठी मी तुमच्यासोबत आहे.
तुम्ही जेव्हा कधीही तुम्ही बोलावल मी प्रत्येकवेळी हजर असेन, असे म्हणत त्यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात आवाज उठवला आहे. यामुळे आता नवाब मलिक काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या आता हे प्रकरण खूपच गाजत आहे.
सध्या हिंदुस्तानी भाऊ सोशल मीडियात खूप चर्चेत असतो. बेधडक भूमिकेसाठी हिंदुस्तानी भाऊची तरुणाईमध्ये खूप क्रेझ आहे. त्यांचे टिकटॉकवर ६ लाखाहून अधिक फॉलोअर्स होते, तर यूट्युबवर तब्बल १० लाखांपेक्षा अधिक सबस्क्राइबर्स आहेत. यामुळे त्यांची चर्चा सुरू असते.
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: