ब्रेकिंग! गोपीचंद पडळकर यांना अटक होण्याची शक्यता, खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

November 09, 2021 , 0 Comments

सांगली । भाजप आमदार गोपीचंद पडळकर वेगवेगळ्या कारणाने सतत चर्चेत असतात. आता गोपीचंद पडळकर आणि त्यांचे वाहन चालक गणेश भुते यांच्यावर सांगलीतील आटपाडी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत गोपीचंद पडळकर आणि ड्रायव्हर भुते यांनी गाडी अंगावर घालून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद राष्ट्रवादीचे पदाधिकारी राजू जानकर याने दिली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते.

अखेर त्यांच्या फिर्यादीवरून कलम 423 अंतर्गत पडळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे पडळकर त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याबाबत पडळकर यांच्या गाडीवर तुफान दगडफेक झाली. आटपाडीमध्ये भाजप आणि शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला.

यामुळे पडळकर यांना अटक देखील होण्याची शक्यता आहे. यावेळी अनेकजण उपस्थित होते, यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजू जानकर हे जखमी झाले आहेत. पडळकर यांनी आपल्या अंगावर गाडी घातल्याचा आरोप राजू जानकर यांनी केला आहे. तसेच पडळकर यांनी देखील आपल्याला संपवण्याचा कट शरद पवार आणि जयंत पाटील करत असल्याचा आरोप केला आहे.

आटपाडीमधील साठे चौकात ही घटना घडली. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमुळे सांगलीमधील राजकारण हे चांगलेच तापले आहे. निवडणूक प्रचार देखील जोरात सुरु आहे. यामुळे रोज काहीना काही राडा होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात आटपाडीमध्ये आले होते. त्यामुळे काही काळ आटपाडीमध्ये तणावाचे वातावरण होते. पोलीस बंदोबस्त देखील वाढविण्यात आला आहे.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: