मंदिर तोडणाऱ्याला तोडण्याची वेळ आलीय, कल्याणमधील भाजप आमदाराचे वादग्रस्त विधान

November 26, 2021 , 0 Comments

ठाणे । कल्याणमधील भाजप आमदार रमेश पाटील सध्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांनी कल्याण परिसरातील मोहने येथे एका मंदिरावर विना परवानगी ज्या अधिकाऱ्याने कारवाई केली. त्याला तोडायची वेळ आली आहे, असे वादग्रस्त विधान केले आहे. या विधानानंतर आता कल्याणमध्ये वेगळा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

तसेच या प्रकरणी अधिकाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे, या संदर्भात आयुक्तांना आम्ही भेटणार आहोत असे पाटील म्हणाले. यामुळे आता हा वाद पेटला आहे. त्यांनी आता कल्याण बंद करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे आता काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कल्याणमध्ये भाजपच्या वतीने एका कार्यक्रमात आमदार रमेश पाटील आणि भाजप आमदार रविंद्र चव्हाण हे उपस्थित होते. यावेळी आमदार रमेश पाटील यांनी वादग्रस्त विधान केले. मोहने परिसरातील एका मंदिरावर विना परवानगी ज्या अधिकाऱ्याने कारवाई केली, त्याला तोडायची वेळ आपल्यावर आली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

मंदिरावर कारवाई करणााऱ्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची आमची मागणी आहे, असेही ते म्हणाले. याबाबत कल्याण पश्चिम येथे एका बांधकामावर कारवाई करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेचे प्रभाग अधिकारी राजेश सावंत मोहने परिसरात गेले होते. यावेळी स्थानिक गावकऱ्यांनी विरोध दर्शविला होता.

मात्र महापालिकेच्या पथकाने या बांधकामावर कारवाई केली होती. कारवाई करुन महापालिकेचे अधिकारी सावंत प्रभाग कार्यालयात परतले होते. या दरम्यान माजी नगरसेवक मुकुंद कोट आणि स्थानिक नागरिक कार्यालयात पोहोचले होते.

यादरम्यान सावंत आणि मुकुंद कोट यांनी सावंत यांच्या कानशिलात लगावली होती. त्याचा व्हीडीओ व्हायरल झाला होता. यामुळे आता आमदार चिडले असून मोठा गोंधळ देखील होण्याची शक्यता आहे.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: