विक्रम गोखलेंवर बोलण्याची तुझी पात्रता आहे का?, स्वराला नेटकऱ्यांनी झाप झाप झापले
मुंबई । काही दिवसांपूर्वी देशाच्या स्वातंत्र्याबाबत अभिनेत्री कंगना रणावतने वादग्रस्तवक्तव्य केले होते. या विधानावरून देशभर तीव्र वादग्रस्त वातावरण असताना ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी तिच्या वक्तव्याचे समर्थन केले. यामुळे आता त्यांच्यावर देखील टीका होत आहे. हा वाद अजूनही सुरूच आहे.
आता यामध्ये अजून भर पडली आहे. यावरून पुन्हा एक नवा वाद निर्माण झाला आहे. विक्रम गोखलेंच्या या विधानावरून मत-मतांतरे होत असताना अभिनेत्री स्वरा भास्कर चर्चेत आली आहे. तिने एक ट्विट केले आहे. मात्र स्वराचे हे ट्विट नेटकऱ्यांना पटले नाही.
स्वराने ट्विटरवरून गोखलेंच्या विधानाची बातमी शेअर केली आहे. लिहिले आहे की, पद्म पुरस्कार येत आहे. यासोबतच तिने हात जोडल्याचे इमोजी पोस्ट केले. असे ट्विट करत स्वराने गोखलेंवर निशाण साधला. यामुळे मात्र स्वराला ट्रोल करण्यात आले आहे.
याबाबत एकाने म्हटले आहे की, मराठी कलाकार हे तुझ्यासारख्या अभिनेत्रीपेक्षा खूप प्रतिभावान आहेत. जर त्यांनी हे वक्तव्य केले आहे, म्हणजे त्यामागे नक्कीच काहीतरी अर्थ असेल. ते पद्म पुरस्कारासाठी असे बोलणार नाहीत. वयाचा विचार कर, ते दररोज तुझ्यापेक्षा अधिक चांगले कलाकार रंगभूमीवरून तयार करतात, अशा शब्दांत युजरने टोला लगावला आहे.
यामुळे हे प्रकरण तिच्या चांगलेच अंगलट आले आहे. गोखले यांनी राजकीय मुद्द्यांवर देखील भाष्य केले. राजकारणातील खेळ इतक्या विचित्र स्तरावर पोहोचले आहेत की, त्यामध्ये महाराष्ट्रातील मराठी माणूस भरडला जात आहे. भाजप आणि शिवसेना यांनी एकत्र आले पाहिजे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, राज्य सरकारवर देखील त्यांनी निशाणा साधला, यामुळे त्यांच्यावर अनेकांनी टीका केली आहे. तसेच भाजपची बाजू घेत अनेक वक्तव्य त्यांनी केली. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: