“मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर ४ महिने भाड्याच्या घरात राहिलो, आमच्याकडे इनामी आणि बेनामीही नाही”

November 17, 2021 , 0 Comments

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री नवाब मलिक आक्रमक झाले आहेत. अनेकांवर त्यांनी वेगवेगळे धक्कादायक आरोप केले आहेत. यामुळे याची चर्चा सुरू आहे. असे असताना देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात सरकारचे कुठेही अस्तित्व दिसत नाही. प्रत्येक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री मानतो. राज्यातील जनता होरपळतेय. पण त्यांच्या प्रश्नाकडे पाहण्यासाठी कुणीही पुढे येत नाही. यामुळे जनतेचे हाल सुरू झाले आहेत.

उद्धव ठाकरेंना कुणीही मुख्यमंत्री मानायला तयार नाही. इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून महाविकास आघाडी सरकारचे नाव लिहिले जाईल. आम्हाला कुणालाही घाबरण्याचे कारण नाही. आमच्याकडे ईनामीही नाही आणि बेनामी नाही. वर्षा बंगल्यातून बाहेर पडलो त्यानंतर मुंबईत घर नव्हते. ४ महिने भाड्याने घर घेऊन राहिलो.

निवासस्थान मिळेपर्यंत भाड्याच्या खोलीत राहिलो, असे प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीसांनी मंत्री नवाब मलिकांना दिले आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. आता पुढे नवाब मलिक काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ड्रग्ज प्रकरणी मलिक यांनी फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप लावले होते.

भाजपाच्या कार्यकारणीत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपल्या काळात जलयुक्त शिवार, मेट्रो, डिजिटल इंडिया, उद्योगावर चर्चा करायची. पण या सरकारच्या काळात हर्बल तंबाखू, वसुली, स्थगिती, बलात्कार, खंडणी यावर चर्चा होते.

प्रत्येक विभागात एक वाझे आहे. सरकार सामान्यांसाठी नव्हे तर ते कायद्याचे नाही तर काय द्यायचे राज्य सुरु आहे. हजारो कोटींची वाटमारी सरकारकडून सुरु आहे. पण सामान्य शेतकऱ्यांकडे पाहायला कुणी तयार नाही, असेही ते म्हणाले.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: