बिरजूची बर्फी भारतातच नाही तर कॅनडा आणि पाकिस्तानमध्ये सुद्धा फेमस आहे

November 17, 2021 , 0 Comments

‘खाने के बाद कुछ मीठा होना चाहिये’, ‘घरात शुभकार्य आहे, काहीतरी गोड पाहिजे राव’, असं ह्या ना त्या बहाण्यानं आपण मिठाई खाण्याचा चान्सचं पाहत असतो. पण मिठाई खायला काय कारण लागत नाही. असं म्हणतात कि, मिठाईचा गोडवा आपल्या नात्यांना आणि जवळ करत. पण पंजाबातल्या गोरायाच्या बर्फीन नात्यातच नाही तर सीमेपलीकडे जात देशांमध्येही गोडवा पसरवण्याचं काम केलंय.

ही बर्फी म्हणजे जालंधर-लुधियाना हायवेवरच्या गोरयातली ‘बिरजू बर्फी वाले’. जे गेल्या ७४ वर्षांपासून आपल्या बर्फीच्या चवीमुळे वर्ल्ड फेमस बनलेत. एवढंच काय पाकिस्तानात सुद्धा या बर्फीचे फॅन आहेत. परदेशात या बर्फीसाठी अड्वान्स बुकिंग केलं जात. दररोज ७० ते ७५ किलो बनणाऱ्या बर्फीपैकी ९० टक्के तर परदेशी डिमांड असते. अनेक वर्ष टिकणाऱ्या या बर्फीची चव कित्येक वर्षांपासून जशीच्या तशीच आहे.

जालंधरहून लुधियानाकडे जाताना गोरयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बिरजू बर्फी वाल्याच्या बर्फीचा सुगंध लोकांना दुकानावर थांबायलाच लावतो. इथल्या गरम आणि प्युअर बर्फीची चव जो कोणी घेतो, तो त्याची स्तुती केल्याशिवाय राहत नाही. आणि जाताना किलोभर बर्फी सोबत घेऊनच जातो.

या बिरजू बर्फी वाल्याच्या बर्फीची चर्चा पाकिस्तान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, बांगलादेश यासारख्या इतर अनेक देशांमध्ये आहे. या दुकानाचे सध्याचे मालक बब्बी  यांच्या म्हणण्यानुसार जगात असा एकही देश नाही, जिथून या बर्फीची मागणी होत नाही.  या स्पेशालिटी म्हणजे या बर्फीत कुठलीच भेसळ नसते, आपल्या समोर ती बनवली जाते. महत्वाचं म्हणजे जेवढी मागणी तेवढीच बनवली जाते.

तर १९६५ मध्ये अनंतराम यांनी बिरजू मिठाईवाला दुकान सुरू केले होते. त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा ब्रिजलाल यांनी या दुकानाचा ताबा घेतला आणि आता त्यांची तिसरी पिढी बब्बी आणि सोडीराम हे दोघे भाऊ मिळून हे दुकान संभाळतायेत. पण इतक्या वर्षांनंतरही ही  बर्फी बनवण्याची स्टाईल अजूनही बदलेली नाही.

सुरुवातीला हे दुकान अगदी लहान होते, पण जसं -जसं ते चालायला लागलं, तशी जागा कमी पडायला लागली. त्यामुळे आता दुकान जरा मोठं बनवलंय. आधी हातानी बनवली जाणारी बर्फी आता २०१० पासून मशीनपासून बनवलीय जातेय.

बर्फीची खासियत म्हणजे बिरजू बर्फी वाल्याची बर्फी फक्त दुधापासून बनवली जाते. त्यात कोणत्याही प्रकारची प्रकारची भेसळ नसते. जस बाकीचे मिठाईवाले बर्फी बनवताना त्यात जास्त साखर घालतात आणि सोबतच बरीच पदार्थ घालतात. पण बिरजू बर्फी वाल्याकडं १ किलो बर्फी बनवण्यासाठी ५ किलो दूध वापरलं जात आणि त्यात फक्त १०० ग्रॅम साखर घातली जाते. एवढा प्युअर माल आजकाल क्वचितच कोणी देत असेल. पण एवढं असूनही त्याची किमतही कमी आहे.

सोडीराम यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं कि, ‘आमचे हेतू पैसे कमवणे नाही, तर बर्फी बनवून त्याची चव जगभर पसरवणं. आमचं सगळं कुटुंब या कामात लागलंय. ग्राहकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी आम्ही चवीत कोणताही बदल केलेला नाही. आणि याच गोष्टीमुळे जगभरातून या बर्फीला मागणी आहे.

हे ही वाच भिडू :

The post बिरजूची बर्फी भारतातच नाही तर कॅनडा आणि पाकिस्तानमध्ये सुद्धा फेमस आहे appeared first on BolBhidu.com.



Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: