सानिया मिर्झाची एक पोस्ट अन् शोएब मलिक बांगलादेश दौऱ्यावरुन परतला; वाचा नक्की कारण काय?

November 24, 2021 , 0 Comments

पाकिस्तानचा ३९ वर्षीय क्रिकेटपटू शोएब मलिक आज बांगलादेशविरुद्ध तिसरा टी २० खेळणार नाही. त्याची आणि सानिया मिर्झाचा मुलगा इझानची तब्येत बिघडली आहे. त्यानंतर शोएबने ढाका ते दुबईचे फ्लाइट पकडले असून थेट दुबई गाठली आहे. त्याची पत्नी सानिया मिर्झाने सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केली होती, त्यामध्ये तिने मुलाच्या आजाराबद्दल सांगितले होते, त्यानंतर त्याने दुबईला परतण्याचा निर्णय घेतला आहे.

शोएब आणि सानिया त्यांचा ३ वर्षांचा मुलगा इझानसोबत दुबईत राहतात. पाकिस्तानने याआधीच ३ टी-२० मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात शोएब मैदानात उतरला होता.

पण त्यावेळी तो फलंदाजीत आणि गोलंदाजीत दोन्ही ठिकाणी अपयशी ठरला. त्याला या मालिकेत एकही धाव करता आली नाही. मालिकेतील पहिल्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता. मात्र, शोएब गेल्या काही महिन्यांपासून उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे.

शोएब मलिक आपल्या मुलाच्या आजारपणामुळे सोमवारी बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी-२० सामन्याला मुकणार आहे आणि सामन्यापूर्वी तो दुबईला जाणार आहे, अशी माहिती पीसीबीने दिली आहे.

२०२१ च्या टी २० विश्वचषकासाठी निवडलेल्या पाकिस्तान संघात सुरुवातीला शोएब मलिकचा समावेश नव्हता. मात्र स्पर्धेच्या काही दिवस आधी शोएब मकसूदच्या दुखापतीमुळे शोएब अख्तरला संघात स्थान मिळाले. हा निर्णय पाकिस्तान संघासाठी योग्य ठरला. टी-२० विश्वचषकात शोएबने अनेक वेळा महत्त्वपूर्ण खेळी खेळल्या. अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात त्याने संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

या स्पर्धेत पाकिस्तानकडून टी-२० मध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा तो फलंदाज ठरला. स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात त्याने अवघ्या १८ चेंडूत अर्धशतक झळकावले. मात्र, उपांत्य फेरीत त्याला काही खास कमाल करता आली नाही. यानंतर तो निवृत्त होणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्याने खेळणे सुरूच ठेवले आहे.

टी-२० मालिकेनंतर पाकिस्तान बांगलादेशविरुद्ध २६ नोव्हेंबरपासून दोन कसोटी सामन्यांची मालिकाही खेळणार आहे. ही मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग असेल. पहिली कसोटी चितगाव येथे तर दुसरी कसोटी ढाका येथे खेळली जाईल.

महत्वाच्या बातम्या-
खोटे चॅट व्हायरल करने नवाब मलिकांना भोवणार; संतापलेल्या क्रांती रेडकरांची सायबर सेलकडे तक्रार
सानिया मिर्झाच्या एका पोस्टमुळे उडाली खळबळ, सामन्याच्या आधीच दुबईला परतला शोएब मलिक
राज्याला केंद्रशासित प्रदेश करा आणि राज्य मोदी सरकारला चालवायला द्या – प्रीतम मुंडे


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: