खोटे चॅट व्हायरल करने नवाब मलिकांना भोवणार; संतापलेल्या क्रांती रेडकरांची सायबर सेलकडे तक्रार

November 24, 2021 , 0 Comments

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यात गेल्या दोन महिन्यांपासून वाद सुरु आहे. याबाबत रोज नवनवीन खुलासे होत आहे. तसेच नवाब मलिक रोज समीर वानखेडेंवर वेगवेगळे गंभीर आरोप करत आहे.

अशातच नवाब मलिकांनी समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर यांच्या चॅट्सचे काही फोटो शेअर्स केले होते. या चॅटमुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. ज्यामध्ये क्रांती रेडकर एका व्यक्तीला नवाब मलिकांचे पुरावे दिल्यास बक्षीस देऊ असे म्हणताना दिसत आहे.

त्या कथित चॅटचे स्क्रीनशॉट नवाब मलिकांनी शेअर केले होते. आता या संदर्भात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर वानखेडे यांनी मुंबई पोलिसांकडे ऑनलाइन तक्रार दाखल केली आहे.

त्यांनी तक्रारीत लिहिले आहे की, माझ्या नावाने बनावट ट्विटर हँडल आणि बनावट चॅट तयार करण्यात आले आहेत. त्या ट्विटर हँडलच्या प्रोफाईल पिक्चरसाठीही माझा एक फोटो वापरण्यात आला आहे. या फेक चॅटचा स्क्रीनशॉट नवाब मलिक यांच्या ट्विटर हँडलवरून कोणतीही पुष्टी न करता ट्विट करण्यात आला आहे.

या कथित चॅटमध्ये, कॅप्टन जॅक स्पॅरो नावाच्या व्यक्तीने नवाब मलिक आणि दाऊदशी संबंध असल्याचा पुरावा देण्यास सांगितले. उत्तरात पुरावे काय, असे विचारले जाते, तर माझ्याकडे नवाब मलिक आणि दाऊदचा फोटो आहे, असे उत्तर दिले जाते. चित्रे पाठवून बक्षीस घेऊन जा, असा रिप्लाय क्रांती यावर देताना दिसून येत आहे.

त्यानंतर राज बब्बर आणि नवाब मलिक यांचा फोटो पाठवला आहे. ज्यावर हे राज बब्बर असल्याचे लिहिले आहे. असे क्रांती म्हणताना दिसते. त्यावर हो, पण राज बब्बरची पत्नीही त्याला प्रेमाने दाऊद म्हणते, असे समोरचा व्यक्ती म्हणताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या-

सानिया मिर्झाच्या एका पोस्टमुळे उडाली खळबळ, सामन्याच्या आधीच दुबईला परतला शोएब मलिक
राहूल द्रविडच्या प्रेमात वेडी झाली होती ‘ही’ अभिनेत्री; त्याने क्रिकेट सोडलं अन् तिनं क्रिकेट बघणं
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अमृता! लाडक्या मैत्रिणीने दिल्या खास शुभेच्छा, पहा व्हिडिओ


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: