पाकिस्तान जिंकल्यावर जल्लोष करणाऱ्या श्रीनगर मेडिकल कॉलेजच्या 100 विद्यार्थिनींची डीग्री रद्द?

November 18, 2021 , 0 Comments

श्रीनगर । नुकताच दुबईत टी 20 वर्ल्डकप पार पडला. यामध्ये झालेल्या भारत- पाकिस्तान सामन्यात भारताचा मोठा पराभव झाला. या विजयानंतर काश्मीरमधील श्रीनगर येथील मेडिकल कॉलेजमध्ये कथितरित्या पाकिस्तान समर्थक घोषणा दिल्याचे एक प्रकरण समोर आले आहे.

तसेच श्रीनगर येथील वैद्यकीय महाविद्यालयातील 100 विद्यार्थिनींच्या पदव्या सरकारने रद्द केल्याचा दावा केला जात आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरू आहे. नेमके हे प्रकरण काय आहे, याबाबत अनेक वेगवेगळ्या गोष्टी सोशल मीडियावर पसरवल्या जात आहेत.

यामध्ये पूजा हिंदू सनातनी बेटी या ट्विटर युजरने हा दावा केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या दाव्यासह एक फोटो देखील शेअर केला गेला आहे. ज्यामध्ये काही बुरखा घातलेल्या महिला दिसत आहेत. यामुळे अनेकांना या कारवाईबाबत संभ्रम होता.

या ट्विटला आत्तापर्यंत 1800 पेक्षा जास्त वेळा रिट्विट केले गेले आहे. परंतु वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या पदव्या रद्द करण्याबाबत काहीही नमूद केलेले नाही, याबाबत न्यूज 18 इंडियाच्या ब्रॉडकास्टचा एक व्हिडिओ देखील याच दाव्यासह शेअर केला जात आहे.

असे असताना आता याचा कुठेही पुरावा सापडला नाही. कीवर्ड सर्च केले असता कोणताही अहवाल सापडला नाही. ज्यामध्ये अशा कोणत्याही निर्णयाचा उल्लेख नाही. यामुळे या कारवाईबाबत कुठेही स्पष्ठ उल्लेख केला नाही.

असे असले तरी श्रीनगरमधील मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या सामन्यानंतर पाकिस्तान समर्थक घोषणा दिल्याप्रकरणी विद्यार्थ्यांवर UAPA गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच कॉलेज प्रशासनाविरुद्ध देखील UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: