अनिल देशमुख यांना होणाऱ्या त्रासाचा एक एक मिनिट वसूल करु!! पवारांची भाजपला थेट धमकी

November 18, 2021 , 0 Comments

नागपूर । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला इशारा दिला आहे. ते सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अनिल देशमुख यांच्या कारवाईवर मोठे वक्तव्य केले आहे. या कारवाईचा मोबदला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व्याजासह परत करतील, असा इशाराच त्यांनी भाजपला दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या कोठडीत आहेत. आणि पवार यांच्या दौऱ्यात ते उपस्थित नाहीत. यावेळी पवार म्हणाले, सत्ता काही लोकांच्या डोक्यात गेली आहे, म्हणून त्यांनी सुडाचे राजकारण सुरु केले आहे. अनिल देशमुख यांच्या प्रत्येक त्रासाचा एक एक मिनिट वसूल करु.

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा नागपूर दौरा होत असे, तेव्हा अनिल देशमुख सोबत असायचेच. असा एकही दौरा टळला नाही. पण आज अनिल देशमुख आत आहेत. त्यांच्यावर आरोप करणारे देखील फरार आहेत. त्यांना अडकवले जात आहे.

अनिल देशमुख यांनी मला वास्तव सांगितले आहे. म्हणून अनिल देशमुख हे पुन्हा सक्रीय होतील. सत्तेतील लोक यंत्रणांचा गैरवापर करत आहेत. त्यांनी आपल्या निकटवर्तीयांच्या घरी टाकलेल्या धाडी, अजित पवार यांना हात लावता येत नाही म्हणून त्यांच्या बहिणींच्या घरी धाडी टाकल्या.

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आले, म्हणून त्यांच्या पत्नीवर आरोप टाकण्यात आले. अशा प्रकारे दबाव तंत्राचा वापर करून कारवाई केली जात आहे. शरद पवारांनी अनिल देशमुख आत आहेत, आणि आरोप करणारे परमबिर सिंग आहेत तरी कुठे?, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

अजित पवार यांच्या घरी अधिकारी आणून बसवून ठेवले, त्यांना विचारल्यावर दिल्लीतून आदेश असल्याचे त्यांनी सांगितले. यावरून लक्षात येते की या यंत्रणांचा कसा वापर केला जात आहे.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: