ज्या जजनं अनिल देशमुखांचं घरचं जेवण बंद केलं, त्या जजची थेट यवतमाळला बदली
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्यांना सध्या अटक करण्यात आली आहे. यावेळी त्यांना कोठडीत घरचे जेवण मिळावे यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने ती फेटाळली आहे.
मुंबईतील विशेष सत्र न्यायालयाचे न्यायधीश एच एस सातभाई यांनी ती याचिका फेटाळली आहे. आधी तुरुंगातील जेवण घ्या, असे म्हणत त्यांनी देशमुखांचा विनंती अर्ज फेटाळून लावला आहे. तसेच १४ दिवसांची न्याययलयीन कोठडी सुनावली होती.
अशात मुंबई उच्च न्यायालयाकडून दुसऱ्याच दिवशी न्यायाधीश एच एस सातभाई यांची यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुका कोर्टात बदली करण्यात आली आहे. अशी अचानक बदली केल्यामुळे विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे.
मुंबई हायकोर्टानं १५ नोव्हेंबरला न्यायाधीश एच एस सातभाई यांची प्रशासकीय कारणामुळे तातडीनं बदली करण्यात येत असल्याचा आदेश दिला आहे. सातभाई केळापूरच्या सत्र न्यायालयात बदली करण्यात आली आहे. बदली होण्यासाठी सुप्रीम कोर्टाची मंजूरी लागते, यावेळी १३ नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टानेही मंजूरी दिली आहे.
दरम्यान, मुंबई हायकोर्टाकडून बदलीचा आदेश मिळताच सातभाई वैद्यकीय रजेवर गेले आहे. बदलीचा आदेश मिळाल्यानंतर त्यांनी लगेचच वैद्यकीय रजेचा अर्ज दिला होता. त्यामुळे ते सध्या वैद्यकीय रजेवर गेलेले आहे.
न्यायाधीश सातभाई यांच्यासमोर राज्यातील बड्या नेत्यांची सुनावणी झाली होतीय यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, एकनाथ खडसे आणि अनिल देशमुख यांच्या प्रकरणाची सुनावणी सातभाई यांच्यासमोर झाली होती. ९ सप्टेंबर २०२१ ला त्यांनी छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या पंकज भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून निर्दोष मुक्त केलं होतं.
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तान जिंकल्यावर जल्लोष करणाऱ्या श्रीनगर मेडिकल कॉलेजच्या 100 विद्यार्थिनींची डीग्री रद्द?
अनिल देशमुख यांना होणाऱ्या त्रासाचा एक एक मिनिट वसूल करु!! पवारांची भाजपला थेट धमकी
काय सांगता! शेणाने तन-मन पवित्र होते, डॉक्टरांनी खाल्ले शेण, व्हिडीओ व्हायरल
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: