VIDEO: नागाला जंगलात सोडण्यासाठी जात होता सर्पमित्र, लोकांच्या हट्टापायी बाहेर काढला नाग अन्…

October 03, 2021 , 0 Comments

सर्पमित्र अनेकदा आपल्या जीव धोक्यात घालून सापांना पकडत असतात, त्यामुळे त्यांची एक चुकही त्यांचा जीव घेऊ शकते. आता असाच काहीसा प्रकार मध्य प्रदेशातील छिंदवाडा शहरात घडला आहे.

छिंदवाडामध्ये लोकांच्या हट्टापायी एका सर्पमित्राचा जीव गेला आहे. संबंधित सर्पमित्राचे नाव संतलाल बंजारी असे आहे. तो तिथल्याच परिसरात राहायचे. तो लोकांच्या घरात आणि दुकान शिरलेला विषारी साप पकडून जंगलात सोडून द्यायचा.

शुक्रवारीही तो साप घेऊन जंगलात नेत होता. त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी त्याला साप बॉक्सबाहेर काढून दाखवण्याचा हट्ट करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्याने तो साप बाहेर काढला, पण यादरम्यान सापाने संतलालचा चावा घेतला. विषारी सापाने चावा घेतल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

परसिया ब्लॉकच्या न्यूटन चिखलीच्या प्रभाग क्रमांक सहामध्ये संतलाल बंजारी राहत होता. त्याला सापांसोबत खेळण्याचा छंद होता. तसेच तिथल्या भागात तो सर्पमित्र म्हणून प्रसिद्ध होता. तो सापांना आपला मित्र मानत असायचा. त्याने नंतर हा छंद लोकांना मदत करण्याचे साधन बनवले. त्यामुळे कुठेही कोणताही साप आढळून आला तर लोक संतलालला बोलवायचे.

परसिया आणि आजूबाजूच्या परिसरात, जेव्हा लोकांच्या घरात, कार्यालयात किंवा दुकानात साप आढळून यायचा. तेव्हा लोक त्याला मदतीसाठी हाक मारायचे. त्याने अनेक विषारी साप पकडले होते, त्या सापांना पकडून तो जंगलात सोडून द्यायचा.

परसियाच्या बस स्टँडजवळ एका विषारी साप आढळून आला होता. तेव्हा संतालालला बुधवारी संध्याकाळी बोलवण्यात आले होते. तिथे त्याने खुप प्रयत्नानंतर सापाला पकडले होते आणि एका बॉक्समध्ये बंद केले होते. पण तिथे असलेल्या लोकांनी त्याला विषारी साप दाखवण्याचा आग्रह केला.

लोकांना त्या कोब्राला बघायचे होते, त्यामुळे त्यानेही साप खाली सोडला. त्यावेळी तो पुन्हा सापाला पकडायला गेला, तेव्हा सापाने त्याला दंश केला. हातमोजे घातले होते, पण तरीही संतलाल सापाच्या विषामुळे बेशुद्ध झाला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. संबंधित घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

सोसायटीच्या चेअरमनने लावला महिलेच्या बेडरुमजवळ सीसीटीव्ही कॅमेरा, टिपले खाजगी क्षण; पुण्यातील धक्कादायक घटना
येडा की खुळा! युवकाने थेट कुकरशी केले लग्न, नंतर हे कारण सांगत घेतला त्याच्याशी घटस्फोट
निलेश लंकेंचं एका खोलीचं पत्र्याचं घर, लाकडी कपाटाला प्लॅस्टिकची खुर्ची लावून बसले शरद पवार


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: