सोसायटीच्या चेअरमनने लावला महिलेच्या बेडरुमजवळ सीसीटीव्ही कॅमेरा, टिपले खाजगी क्षण; पुण्यातील धक्कादायक घटना

October 03, 2021 , 0 Comments

पुण्यात काही दिवसांपासून अनेक धक्कादायक घटना घडत आहे. असे असतानाच आता पुण्याच्या एका हौसिंग सोसायटीमधून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे.

पुण्यात एका हौसिंग सोसायटीमध्ये एका महिलेच्या घराच्या शेजारी एक सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आला होता. त्यामुळे महिलेच्या बेडरूममध्ये काय सुरु आहे? या सर्व गोष्टी आरोपी बघत होते. पुण्यात घडलेल्या या प्रकारामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिनाभरापासून तीन लोक त्या कॅमेऱ्याच्या मदतीने महिलेच्या बेडरुममध्ये काय चालले होते हे बघत होते.असा आरोप महिलेने केला आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून महिनाभरापासून घरात काय सुरु होते, या सर्व गोष्टी सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी आणि खजिनदार बघत होते, असा आरोप त्या महिलेने केला आहे.

संबंधित घटना पुण्यातील एका हौसिंग सोसायटीमध्ये घडली आहे. संबंधित सोसायटी ही हिंडवडी-वाकड रोडला आहे. ५ ते २८ सप्टेंबर दरम्यान घडली आहे. असे त्या महिलेने पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.

महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपी बेडरुममधल्या सर्व गोष्टी पाहत होते. बेडरुम ही प्रत्येकाची खाजगी गोष्ट असते, त्यामुळे एखाद्या महिलेच्या बेडरुममध्ये अशाप्रकारे डोकवणे हा एक गुन्हा आहे, असे त्या महिलेने तक्ररीत म्हटले आहे.

संबंधित गोष्ट जेव्हा महिलेच्या लक्षात आली, तेव्हा तिने लगेच तो सीसीटीव्ही काढून टाकण्यास सांगितला. तेव्हा संबंधित आरोपींनी सीसीटीव्ही काढण्यास नकार दिला. त्यामुळे महिलेने तक्रार दाखल केली आहे.

कॅमेरा लावून ५ ते २८ सप्टेंबर दरम्यान खाजगी कपड्यात असतानाचे चित्रिकरण करुन ते आरोपींनी बघितले असल्याचे महिलेने म्हटले आहे. दरम्यान पोलिसांनी तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या-

लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली, घरही भाड्याचं; २१ हजार कोटींच्या ड्रग्स प्रकरणात दाम्पत्याला अटक, पोलिसही चक्रावले
हार्दिक पांड्या संघाबाहेर का होता? तो गोलंदाजी का करत नाही? धक्कादायक माहिती आली समोर..  
“नेत्यालाच आपला बाप मानणारी शेतकऱ्यांचीच पोरंच जास्त आहेत याच सर्वात मोठं दुःख आहे”


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: