“किरीट सोमय्या ही मुर्ख व्यक्ती आहे, केंद्रातली सत्ता गेली तर परदेशात पळून जाण्याची वेळ येईल”

October 03, 2021 , 0 Comments

भाजप नेते किरीट सोमय्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरही शेकडो कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले आहे. या आरोपांमुळे महाविकास आघाडीचे नेतेही किरीट सोमय्यांवर टीका करताना दिसून येत आहे.

आता किरीट सोमय्या यांच्यावर शिवसेनेने हल्लाबोल केला आहे. पक्षाविषयी, मातोश्रीविषयी काही बोलू नको, लायकीत राहा. मुंबईत कुठेही या शिवसेनेत काय आहे हे दाखवून देऊ, असे आव्हान शिवसेनेचे कोल्हापूरचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिले आहे.

सोमय्यांकडून ठाकरे कुटुंबियांवरही आरोप करण्यात आले होते. त्यामुळे राजेश क्षीरसागर आक्रमक झाले आहे. केंद्राचं संरक्षण घेऊन फिरण्यापेक्षा मुंबईत कुठेही या शिवसेनेत काय आहे, ते दाखवून देऊ, असे राजेश क्षीरसागर यांनी म्हटले आहे.

तसेच किरीट सोमय्या ही मुर्ख व्यक्ती आहे, त्यांची लायकी त्यांना शिवसेनेने दाखवून दिली आहे. केंद्रातली सत्ता गेल्यावर त्यांच्यावर परदेशात पळून जाण्याची वेळ येईल, अशी टीकाही राजेश क्षीरसागर यांनी केली आहे.

किरीट सोमय्या आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील वाद आधीपासून आहे. लोकसभा निवडणूकीपुर्वी सोमय्यांनी मातोश्रीवर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे शिवसेनेने किरीट सोमय्यांचे तिकीट कापण्यासाठी भाजपला मजबूर केलं होतं. आता पुन्हा भाजप-शिवसेना वेगळे झाल्याने किरीट सोमय्या मातोश्रीवर गंभीर आरोप करत आहे.

किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांच्या नावाने अलिबागमध्ये १९ बंगल्यांचा घोटाळा केला आहे, असा गंभीर आरोप किरीट सोमय्यांनी केला होता.

महत्वाच्या बातम्या-

VIDEO: नागाला जंगलात सोडण्यासाठी जात होता सर्पमित्र, लोकांच्या हट्टापायी बाहेर काढला नाग अन्…
सोसायटीच्या चेअरमनने लावला महिलेच्या बेडरुमजवळ सीसीटीव्ही कॅमेरा, टिपले खाजगी क्षण; पुण्यातील धक्कादायक घटना
हार्दिक पांड्याची जागा घेणार ‘हा’ ऑलराऊंडर खेळाडू? सुनील गावसकर यांचा मोठा खुलासा


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: