तुम्हालाही हा मेसेज येत असेल तर सावधान! SMS च्या जाळ्यात अडकून तरुणाने गमावले ३ लाख

October 01, 2021 , 0 Comments

मुंबई । आपल्या मोबाईलवर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज येत असतात. यामध्ये अनेक ई-कॉमर्स कंपनीमध्ये नोकरीची ऑफर दिली जाते, मात्र आपली मोठी फसवणूक केली जाऊ शकते. यामुळे आता वेळीच सावध व्हा. याबाबत तक्रारी वाढतच चालल्या आहेत. मुंबईतील वडाळा येथील एका तरुणाला ३ लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

यामुळे आता पोलिसांनी सर्वांना सतर्क केले आहे. ही घटना तुमच्यासोबत देखील घडू शकते, त्यामुळे सतर्क राहणे आवश्यक आहे. येथील एक २६ वर्षीय तरुणाला एक मेसेज आला. यामध्ये एका प्रसिद्ध कंपनीसह पार्ट टाइम जॉब केल्यास तुम्हाला प्रति दिन जवळपास आठ हजार रुपये मिळतील, असे सांगण्यात आले.

यामध्ये हा तरुण फसला त्याला वाटले की ही एक चांगली संधी आहे. यामध्ये एक एक WhatsApp Link होती. त्यावर क्लिक केल्यानंतर एक नंबर ओपन झाला आणि समोरील व्यक्तीने तिचे नाव सांगितले. यामुळे या तरुणाचा विश्वास बसत गेला. त्या मुलीने लिंकवर नोंदणी करा, असे सांगितले.

त्याला अनेक फोन आले, यामुळे त्याला वाटले की आपल्याला नोकरी मिळणार. त्याचा विश्वास संपादन केल्यानंतर या व्यक्तींनी त्याच्याकडून पैसे उकळण्यासाठी पुढील चाल खेळली. त्यांनी असं सांगितलं की आता काही पैसे जमा केल्यास मोठा बोनस मिळेल. यासाठी देखील तो तयार झाला.

त्याने एकूण ३ लाख ४ हजार रुपये ट्रान्सफर केले. जेव्हा अजिबात बोनस मिळाला नाही. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की त्याच्यासह फ्रॉड झाला आहे. यामुळे त्याला एकच धक्का बसला. त्याने पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे. याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.

याबाबत जर कुणी संशयास्पद लिंक शेअर केली तर त्यावर क्लिक करू नका. मेसेज किंवा मेलच्या माध्यमातून अशा लिंक पाठवल्या जातात. जर तुम्हाला नोकरीसाठी पैसे मागितले तर ते देऊ नका, कारण ती फसवणूकच असेल. अशी काळजी घेणे गरजेचे आहे.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: