कट्टर विरोधक दिग्वीजयसिंहानी केले अमित शहा आणि आरएसएसचे कौतूक; चर्चांना उधान

October 01, 2021 , 0 Comments

नवी दिल्ली। नर्मदा यात्रेवर लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनाप्रसंगी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी गृहमंत्री अमित शहा आणि आरएसएसचे कौतुक केले आहे. मात्र आयुष्यभर ज्यांनी संघ आणि भाजपवर टीका केली, पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर अनेक आरोप केले, तेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह अमित शहा आणि संघाचे कौतुक करत असल्याने अनेकांना आश्चर्यचा धक्का बसला आहे.

ते म्हणाले की, या नर्मदा परिक्रमेदरम्यान मला सरकार आणि संघाचं भरपूर सहकार्य मिळालं. हेच नाही तर ज्या अमित शाह आणि संघाचा मी सर्वात मोठा टीकाकार आहे, त्यांनी केलेलं सहकार्य विसरु शकत नाही असंही ते म्हणाले.

दिग्विजय सिंह म्हणाले की, त्यांच्या नर्मदा यात्रेदरम्यान अमित शहा यांनी वन अधिकाऱ्यांना विचारून विश्रामगृहात त्यांची व्यवस्था केली होती. मोठा टीकाकार असूनही अमित शहा यांनी याची पूर्ण काळजी घेतली की त्यांच्या नर्मदा यात्रेमध्ये कोणताही अडथळा येऊ नये. दिग्विजय सिंह म्हणाले की, ते अमित शाह यांना समोरासमोर कधीच भेटले नाहीत. पण तरीही त्यांनी या सहकार्यासाठी गृहमंत्र्यांना आभार पत्र पाठवले होते.

दिग्विजय सिंह आणि त्यांच्या पत्नी अमृता हे 2017 मध्ये नर्मदा नदीच्या किनारी पायी परिक्रमा केली होती. दरम्यान, एका रात्री 10 वाजता गुजरातमधील आपल्या इच्छितस्थळी आम्ही पोहोचलो पण इथं जंगलात पुढे रस्ताच नव्हता तसेच तिथं रात्रभर थांबण्याची कोणतीही सुविधा नव्हती.

तुम्हाला विश्वास बसणार नाही पण यावेळी एक वनाधिकारी तिथं आला आणि त्यानं मला सांगितलं की, अमित शहा यांनी तुम्हाला पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश मला दिले आहेत. त्यावेळी गुजरातमध्ये निवडणुका सुरु होत्या. तसेच मी त्यांचा मोठा टीकाकार होतो. पण शहा यांनी आमच्या यात्रेत कोणतीही अडचण येऊ नये याची काळजी घेतली.

यावेळी वनाधिकाऱ्यानं आमच्यासाठी डोंगरातून मार्ग शोधत सर्वांच्या जेवणाचीही व्यवस्था केली, असं दिग्विजय सिंह यावेळी म्हणाले. संघाच्या कार्यकर्त्यांनी मांझी समाजाच्या धर्मशाळेत आमच्या टीमची राहण्याची व्यवस्था केली.

तसेच ज्या हॉलमध्ये आमची व्यवस्था करण्यात आली होती तिथल्या भितींवर संघाचे दिग्गज लोक हेडगेवार आणि गोळवलकर यांच्या प्रतिमा होत्या. 2018 मध्ये काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी पत्नी अमृता सिंह यांच्यासोबत मिळून नर्मदा पदयात्रा केली होती. त्यावेळी ते 192 दिवस चालले होते.

त्यांची ही यात्रा नरसिंहपूर जिल्ह्यातल्या बर्मन घाटावर संपली होती. घाटावर पोहचल्यानंतर दिग्विजय यांनी सपत्नीक पूजा केली होती. सिंह पती पत्नीचा हा प्रवास तब्बल 3, 300 किलोमीटर लांबीचा होता.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: