'हजार कोटींच्या दलालीचे पुरावे आयकर खात्याला सापडल्यानेच...'; विखेंचा आरोप
अहमदनगर : येथील घटनेसंबंधी मंत्रिमंडळाच्या बैठकीत शोकप्रस्ताव संमत करणे ही सरकारची निव्वळ ढोंगबाजी आहे. एक हजार पन्नास कोटींच्या दलालीचे पुरावे आयकर खात्याला सापडल्याने जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी पुकारण्यात आला आहे. जनतेस तोंड दाखवायला जागा न राहिलेले सत्ताधारी पक्षातील अनेकजण चौकशीचा ससेमिरा चुकविण्यासाठी पळापळ करत आहेत आणि दुसरीकडे जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी बंद पुकारला जात आहे, असा टोला भाजपचे नेते, माजी मंत्री यांनी लगावला आहे. ( ) वाचा: प्रसारमाध्यमांशी बोलताना विखे पाटील म्हणाले, उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखविणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील संकटग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर का सोडले? नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीच्या कोरड्या आश्वासनांपलीकडे सरकारने काहीही दिलेले नाही. निसर्ग आणि तौक्ते वादळात नुकसान झालेल्यांना सरकारने जाहीर केलेली मदतही अजून पोहोचलेली नाही. पीक विम्याचा लाभही शेतकऱ्यांना मिळू शकलेला नाही. कर्जमाफीची योजना जाहीर झाल्यानंतर सरकार प्रोत्साहन अनुदान देणार होते त्याचे काय झाले? रायगड जिल्ह्यात दरड कोसळल्यामुळे उद्ध्वस्त झालेली कुटुंब अजूनही मदतीची वाट पाहात आहे. यापूर्वी भाजप बरोबर सत्तेत असताना बांधवार जावून हेक्टरी ५० हजार रुपयांच्या मदतीच्या केलेल्या मागणीचाही सोयीस्कर विसर शिवसेनेला पडला आहे. वाचा: लखीमपूरमध्ये काय झाले, त्यावर काय कारवाई करायची, ते पाहण्यास उत्तर प्रदेश सरकार सक्षम आहे. ही घटना दुर्दैवी आहे, या घटनेचे समर्थन होऊच शकत नाही, पण महाराष्ट्रात रोज शेतकऱ्यांवर मरण ओढवत असताना त्यावर मात्र चकार शब्द बोलत नाही याचे आश्चर्य वाटते. मंत्रिमंडळात लखीमपूर खेरी घटनेवर राजकारण केले जाते, हा केवळ राजकीय स्टंट आहे. ज्यांच्या मेहेरबानीमुळे ठाकरे सरकार अस्तित्वात आले, त्या काँग्रेसची खुशामत करण्यासाठी राज्यातील संकटग्रस्तांना वेठीस धरू नये. राज्यातील सत्ताधारी नेते, सनदी अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची हजारो कोटींची प्रकरणे बाहेर येत आहेत. आयकर खात्याने अधिकृतपणे हा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला आहे. जनतेस तोंड दाखवायला जागा न राहिलेले अनेकजण चौकशीचा ससेमिरा चुकविण्यासाठी पळापळ करत आहेत. नवी प्रकरणे बाहेर येऊ लागल्याने अनेकजण धास्तावले आहेत. आपल्या भ्रष्टाचारावर आणि नाकर्तेपणावर पांघरूण घालण्यासाठी लखीमपूर प्रकरण महाराष्ट्रात पेटवून जनतेचे लक्ष अन्यत्र वळविण्याचा सरकारचा डाव आहे. सरकार राज्यातील जनतेसाठी काहीही करू शकत नाही, हे महाविकास आघाडी सरकारने आपल्या नाकर्तेपणातून सिद्ध केले आहे. राजकारण करून जनतेचे लक्ष समस्यांपासून दूर नेता येईल, पण त्यामुळे भ्रष्टाचाऱ्यांवरील कारवाया थांबविता येणार नाहीत. दररोज नव्या भ्रष्टाचाराचे दाखले समोर येत असल्याने, महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून ठाकरे सरकारची होणारी नोंद पुसता येणार नाही. अगोदरच करोनाकाळात कंबरडे मोडलेल्या महाराष्ट्रात बंद पुकारून जनतेला अधिकच हलाखीत लोटण्याचे पाप महाविकास आघाडी सरकारने केले आहे, असा आरोपही विखे पाटील यांनी केला. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: