'बंद मेंं कभी कभी ऐसा हो जाता है'; संजय राऊत यांची 'महाराष्ट्र बंद'बाबत प्रतिक्रिया
मुंबई: लखीमपूर खेरी हिंसाचाराचा () निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने () (Maharashtra Bandh) पाळला. काही ठिकाणी लोकांनी स्वत:हून बंद पाळल्याचे दिसले, तर काही ठिकाणी हिंसक किंवा वादाच्या घटनाही पाहायला मिळाल्या. एकूणच आजच्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. मात्र, आजचा बंद हा १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावा शिवसेनेचे खासदार (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे. बंदमधील हिंसक घटनांवर बोलताना राऊत यांनी शेतकऱ्यांच्या रक्ताचा अपमान करणाऱ्यांवर जर का हात जोडणाऱ्यांचा हात सुटला असेल, तर ते आंदोलन आहे, असे सांगत, 'बंद में कभी कभी ऐसा हो जाता है', अशी टिप्पणी केली. (Shiv Sena MP has said that was one hundred percent successful) बंदबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीने पुकारलेला आजचा महाराष्ट्र बंद शंभर टक्के यशस्वी झाला आहे. या बंदचा मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जबरदस्त प्रभाव होता. या बंदमध्ये लोक स्वत:हून सहभागी झाले होते, असे सांगतानाच काही ठिकाणी बाचाबाची झाली, वाद झाल्याचे त्यांनी मान्य केले. क्लिक करा आणि वाचा- आंदोलनांमध्ये अशा प्रकारच्या घटना नेहमी होत असतात, असे सांगतानाच असे बंद यापूर्वी अनेकांनी केलेले आहेत. भाजपनेही बंद केले नाही का पूर्वी? बंद हे अशाच पद्धतीनेच केले जातात, असे राऊत म्हणाले. काही लोकांना हा बंद कशासाठी पुकारला गेला हेच कळत नाही. असे लोक नतदृष्ट असतात. आजचा महाराष्ट्र बंद हा काही राजकीय बंद नव्हता. राजकीय स्वार्थासाठी बंद नव्हता किंवा एखाद्या पक्षाला फायदा व्हावा म्हणून पुकारलेला हा बंद नव्हता, असेही ते पुढे म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- 'बंद में कभी कभी ऐसा हो जाता है' बंदवर प्रतिक्रिया देत असताना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी राऊत यांना राज्यभरात झालेले वाद आणि हिंसक घटनांबाबत विचारले. यावेळी बंद पाळण्यासाठी दमदाटी करणे किंवा ठाण्यात शिवसैनिकांकडून ऑटो रिक्षा चालकांना मारहाण केल्याची घटनांचा उल्लेख करण्यात आला. त्यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, शेतकऱ्यांच्या रक्ताचा अपमान करणाऱ्यांवर जर हात जोडणाऱ्यांचा हात सुटला असेल, तर ते आंदोलन आहे. जसे आपले एक गाणे आहे की, प्यार मे कभी कभी ऐसा होता है, तसेच 'बंद मै कभी कभी ऐसा हो जाता है' असे राऊत म्हणाले. क्लिक करा आणि वाचा-
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: