उत्तर प्रदेशात रामराज्याच्या नावाखाली तालीबानी राजवट!; पटोले बरसले
मुंबई: उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील शेतकरी हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी व शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला राज्यातील जनतेने व व्यापाऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. राज्यभरात सर्वच जिल्ह्यांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. शेतकऱ्यांच्या न्यायाच्या लढाईला प्रचंड पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतानाच शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईपर्यंत संघर्ष करत राहू, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांनी सांगितले. ( ) वाचा: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आज काँग्रेस नेत्यांनी राजभवनावर मौनव्रत आंदोलन केले. विधीमंडळ पक्षनेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, मत्स्यसंवर्धन मंत्री अस्लम शेख, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुआ, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, उपाध्यक्ष हुसेन दलवाई, चारुलता टोकस, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यावेळी उपस्थित होते. मौनव्रत आंदोलनानंतर काँग्रेस शिष्टमंडळाने राजभवनात निवेदन दिले. वाचा: यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, आजचा बंद पूर्णपणे यशस्वी झाला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये नागरिकांनी कडकडीत बंद पाळून शेतकऱ्यांचे मारेकरी भाजपला सणसणीत चपराक लगावली आहे. बंदला विरोध करून भारतीय जनता पक्षाने आपला खरा शेतकरी विरोधी चेहरा दाखवून दिला आहे. त्यांच्या मंत्र्यांचा मुलगा गाडीखाली शेतकऱ्यांना चिरडून मारतो तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री यांचे हृदय द्रवले नाही. या घटनेतील गुन्हेगारांना वाचवण्यासाठी भाजप आटापिटा करत आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांनी दिलेल्या लढ्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने नाईलाजाने का होईना सहा दिवसानंतर आरोपीला अटक केली. उत्तर प्रदेशात रामराज्याच्या नावाखाली तालीबानी राजवट सुरू असून उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांचे बळी दिले जात आहेत. वाचा: महाराष्ट्र बंदवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांवरही पटोले यांनी निशाणा साधला. आणि भारतीय जनता पक्षाला शेतकऱ्यांबद्दल बोलण्याचा काहीही अधिकार नाही. त्यांचा ढोंगीपणा उघड झाला आहे. भाजपाच्या धोरणांमुळेच देशातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे मागील दोन वर्षांत सातत्याने नैसर्गिक संकटामुळे मोठे नुकसान झाले आहे परंतु, केंद्रातील मोदी सरकार मात्र महाराष्ट्राला पुरेशी मदत देत नाही, महाराष्ट्राशी दुजाभाव करत आहे. फडणवीस व राज्यातील भाजप नेत्यांना शेतकऱ्यांचा खरंच कळवळा असेल तर त्यांनी मोदींना भेटून राज्यातील शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून द्यावी, असे आवाहन करतानाच या बंदमध्ये शेतकरी, व्यापारी व जनतेने उत्स्फूर्त सहभाग नोंदवून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा संदेश दिला आहे, असे पटोले म्हणाले. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: