‘मन्नत’च्या बाहेर जल्लोष; आर्यन खानला जामीन मिळताच फटाके फोडत घोषणाबाजी सुरुच…

October 29, 2021 , 0 Comments

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रूझ ड्रग्ज प्रकरणात जामीन मिळताच त्याच्या घराबाहेर म्हणजेच ‘मन्नत’ समोर चाहत्यांनी मोठी गर्दी केली आहे. आर्यनच्या समर्थनार्थ शाहरुख खानचे चाहते मोठ्या संख्येने जमले आहेत. फटाक्यांची आतिषबाजी केली जात आहे. चाहते आर्यनचे फोटो आणि शाहरुखच्या फॅमिली फोटोंसह मन्नत बाहेर घोषणा देत आहेत.

आर्यन खानला अटक झाल्यापासून त्याच्या सुटकेसाठी चाहते गेल्या २६ दिवसांपासून रस्त्यावर आणि सोशल मीडियावर आपला पाठिंबा दर्शवत आहेत. अशा स्थितीत आता जामीन मिळाल्याने आनंद फक्त मन्‍नतच्या आतच नाही तर बाहेरही साजरा करताना दिसत आहे.

न्यायालयाकडून अद्याप आदेशाची प्रत मिळालेली नाही म्हणून आर्यनला अद्याप सोडण्यात आले नाही. ऑर्डर प्रत आल्यानंतर आर्यनला शुक्रवारी किंवा शनिवारी सोडले जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत कुटुंबीयांसोबतच चाहत्यांचा आनंदही पाहण्यायोग्य आहे.

सलग तीन दिवसांच्या सुनावणीनंतर गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना जामीन मंजूर केला. क्रूझ ड्रग्ज प्रकरणात, एनसीबीने २ ऑक्टोबरच्या रात्री आर्यनसह ८ जणांना ताब्यात घेतले होते, त्यानंतर सर्वांना ३ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली.

याआधी आर्यन खानचा जामीन मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्ट आणि सेशन कोर्टाने फेटाळला होता. अशा स्थितीत त्याच्या समर्थनार्थ उभ्या असलेल्या चाहत्यांची निराशा झाली होती. त्यानंतर सर्वजण उच्च न्यायालयाकडे आस लावून बसले होते.

यापूर्वी सत्र न्यायालय ते उच्च न्यायालयापर्यंतच्या सुनावणीदरम्यान शाहरुख खानचे चाहते न्यायालयाच्या आवाराबाहेर समर्थनार्थ उभे असल्याचे दिसले होते. अर्थात गुरुवार हा शाहरुख खान, गौरी खान आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस आहे.

माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी आर्यनच्या जामिनासाठी हायकोर्टात युक्तिवाद केला. सतीश मानशिंदे हेही त्यांच्यासोबत उपस्थित होते. तर अरबाज मर्चंटसाठी अमित देसाई आणि मुनमुन धमेचासाठी अली काशिफ खान देशमुख यांनी युक्तिवाद केला. एनसीबीच्या वतीने एएसजी अनिल सिंग यांनी न्यायालयात जामिनाला विरोध केला.

बुधवारी न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्या न्यायालयात एएसजी अनिल सिंग यांनी आर्यन खानवर पुन्हा एकदा ड्रग्ज सेवन, ड्रग्जची तस्करी आणि यासंदर्भात कट रचल्याचा आरोप केला. मात्र, कटकारस्थान आणि तस्करीबाबत कोणताही पुरावा ते सादर करू शकले नाही.

अरबाज मर्चंटकडून ६ ग्रॅम चरस जप्त करण्यात आल्याने आणि त्यावेळी आर्यन त्याच्यासोबत होता म्हणून  जाणीवपूर्वक त्याला ताब्यात घेण्याचा उल्लेखही कोर्टात केला. यावर मुकुल रोहतगी यांनी अनेक न्यायालयीन प्रकरणांचा संदर्भ देत येथे कॉन्शस पझेशन लागू होत नसल्याचे सांगितले. एवढेच नाही तर ते म्हणाले की आम्ही जरी ते मान्य केले तरी ६ ग्रॅम हे व्यावसायिक प्रमाण नाही.

महत्वाच्या बातम्या
शाहरुखचा मुलगा आर्यनला ड्रग्ज प्रकरणात जामीन मिळताच सोनू सूदने दिली ‘ही’ धक्कादायक प्रतिक्रिया
तरुणांचा जीवघेणा बाईक स्टंट! स्टंट करताना झाला भयंकर ब्लास्ट, व्हिडिओ पाहाल तर हैराण व्हाल
25 कोटी वानखेडेंनी नाहीतर प्रभाकर साईलनेच घेतले आहेत, नव्या आरोपांनी खळबळ
क्रांती रेडकरला पाठिंबा देण्यावरून सुमीत राघवन आणि शेफाली वैद्य यांच्यात जुंपली


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: