आर्यनला जामीन मिळवून देणारे वकील मुकूल रोहतगी आहेत तरी कोण? फी ऐकूनच धक्का बसेल

October 29, 2021 , 0 Comments

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यानंतर गुरूवारी २५ दिवसांनंतर त्याला जामीन मिळाला. आर्यन खानला विशेष न्यायालय, कनिष्ठ न्यायालय आणि सत्र न्यायालयातून जामीन न मिळाल्याने दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर गुरूवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. विशेष म्हणजे सतीश मानशिंदे आणि अमित देसाई आणि मुकुल रोहतगीसारखे दिग्गज वकील त्याला जामीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत होते.

अशा परिस्थितीत आता माजी अटार्नी जनरल मुकुल रोहतगी उच्च न्यायालयात आर्यन खानची बाजू मांडली. त्यांच्यामुळेच आर्यनला जामीन मिळाला अशी चर्चा सुरू आहे. न्यायमुर्ती नितीन सांबरे यांच्या न्यायालयात मुकुल रोहतगी यांच्यासह सतीश मानशिंदे आणि अमित देसाई हे वकील उपस्थित होते. प्रसिद्ध वकील मुकुल रोहतगी यांनी मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण घेतले. तेथून निघाल्यानंतर रोहतगी यांनी त्यावेळचे प्रसिद्ध वकील योगेश कुमार सभरवाल यांचे कनिष्ठ राहून सराव सुरू केला.

योगेश कुमार सभरवाल हे २००५-२००७ पर्यंत देशाचे ३६ वे सरन्यायाधीशही होते. मुकुल रोहतगी यांना दिल्ली उच्च न्यायालयाने १९९३ मध्ये वरिष्ठ कौन्सिलचा दर्जा दिला आणि रोहतगी १९९९ मध्ये अतिरिक्त सॉलिसिटर जनरल बनले. २००२ च्या गुजरात दंगलीप्रकरणी मुकुल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयात गुजरात सरकारची बाजू मांडली होती. याशिवाय बनावट चकमक प्रकरणातही त्यांनी राज्य सरकारच्या न्यायालयात युक्तिवाद केला.

याशिवाय बेस्ट बेकरी खटला, जाहिरा शेख खटला, योगेश गौडा खून प्रकरणातही त्यांनी सर्वोच्च न्यायालयात लढा दिला आहे.मुकुल रोहतगी यांचे वडील अवध बिहारी रोहतगी दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. १९ जून २०१४ रोजी त्यांना देशाचे अटार्नी जनरल बनवण्यात आले. मुकुल यांनी १८ जून २०१७ पर्यंत देशाचे १४ वे महाधिवक्ता म्हणून काम केले. मुकुल रोहतगी हे देशातील प्रसिद्ध वकील आणि सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ आहेत.

नुकतेच ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी आर्यन खानचे समर्थन केले होते. सत्र न्यायालयाने जामीन फेटाळण्यापूर्वी मुकुल रोहतगी म्हणाले होते की, आर्यनला तुरुंगात ठेवण्याचे कोणतेही न्याय्य कारण नाही. एनसीबीवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) शहामृगासारखे आहे त्यांनी वाळूमध्ये डोके लपवले आहे.’ सेलिब्रेटीचा मुलगा असल्याची किंमत आर्यन चुकवत आहे.

सोशल मिडीयावरही त्यांचीच चर्चा
मुकुल रोहतगी यांनी केलेल्या युक्तीवादामुळे न्यायालयाला जामीन मंजूर करणे भाग पडले. आर्यनला जामीन मिळाल्यानंतर सोशल मीडिया आणि इतर प्लॅटफॉर्मवर माजी एजी मुकुल रोहतगींचीच चर्चा जोरात सुरू झाली आहे. लोकांना जाणून घ्यायचे आहे की मुकुल रोहतगी यांची फी किती आहे आणि आर्यन खान प्रकरणात त्यांची एन्ट्री कशी झाली? तर आर्यन खानची वकिली करणारे वकील मुकुल रोहतगी याआधीही अनेक प्रसिद्ध केसेसचा भाग राहिले आहेत.

रिपोर्ट्सनुसार, रोहतगी एका सुनावणीसाठी सुमारे १० लाख रुपये घेतात. तथापि, आरटीआयला दिलेल्या उत्तरात, महाराष्ट्र सरकारने म्हटले होते की त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या वतीने न्यायाधीश ‘बीएच लोया खटल्यासाठी’ वरिष्ठ कौन्सिल मुकुल रोहतगी यांना फी म्हणून १.२१ कोटी रुपये दिले होते.

आर्यनच्या केसमध्ये एन्ट्री कशी झाली?
आर्यन खानच्या वतीने हायकोर्टात युक्तिवाद करणारे वकील मुकुल रोहतगी यांनी या प्रकरणी यापूर्वीही आपली प्रतिक्रिया दिली होती. ट्रायल कोर्टाने आर्यनची याचिका फेटाळल्यानंतर, मुकुल यांनी एनसीबीवर टीका केली होती आणि केंद्रीय तपास संस्थेला “शुतुरमुर्ग” म्हटले होते. मुकुल रोहतगी म्हणाले होते की, एनसीबीकडे आर्यनला तुरुंगात ठेवण्याचे कोणतेही कारण नाही, तोे वाळूत डोके लपवून ठेवणाऱ्या शहामृगासारखे वागत आहेत. आर्यन खान सेलिब्रिटी असण्याची किंमत चुकवत आहे. तेव्हापासून आर्यनसाठी रोहतगी यांच्यापाठोपाठ मुकुल यांचेही नाव आले असे बोलले जाते.

महत्वाच्या बातम्या
‘मन्नत’च्या बाहेर जल्लोष; आर्यन खानला जामीन मिळताच फटाके फोडत घोषणाबाजी सुरुच…
आर्यनच्या जामीनानंतर शाहरूखच्या डोळ्यात आले आनंदाश्रू; वकीलांनीच केला खुलासा
आर्यन खानच्या जामीनात ‘या’ मंत्रालयाने बजावली महत्वाची भूमिका; वकील रोहतगींनीच केला खुलासा
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचा फोन हॅक करण्यासाठी मला संपर्क केला; हॅकरचा धक्कादायक खुलासा

 


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: