आर्यनला जामीन मिळताच शाहरुख रिलॅक्स; रोहतगी, मानेशिंदे म्हणाले...

October 29, 2021 0 Comments

मुंबई: मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता याचा मुलगा याला ३ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज २६व्या दिवशी मुंबई हायकोर्टाने आर्यनला जामीन मंजूर केला. आर्यन आणि त्याच्या कुटुंबीयांना यामुळे मोठा दिलासा मिळाला असून कोर्टात आर्यनची बाजू मांडणाऱ्या वकिलांच्या चेहऱ्यावरही समाधान पाहायला मिळाले. ज्येष्ठ वकील आणि यांनी याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. दरम्यान, आर्यनच्या जामीन अर्जावर निकाल जाहीर झाल्यानंतर ज्येष्ठ वकील आणि सतीश मानेशिंदे यांनी आपल्या ज्युनिअर वकिलांसह अभिनेता शाहरुख खानची भेट घेतली. या भेटीचा फोटो समोर आला असून यात सगळेच रिलॅक्स मूडमध्ये दिसत आहेत. ( ) वाचा: मुंबईतील एनडीपीएस कोर्टाने आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर आर्यन याने मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. एनडीपीएस कोर्टात ज्येष्ठ वकील अमित देसाई आणि सतीश मानेशिंदे यांनी आर्यनची बाजू मांडली. प्रकरण हायकोर्टात आल्यानंतर आर्यनसाठी मुकुल रोहतगी यांना पाचारण केलं गेलं. रोहतगी लंडनहून तातडीने मुंबईत आले. मुंबई हायकोर्टात आर्यनच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी सुरू झाली. मात्र मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस ही सुनावणी अपूर्ण राहिली. रोहतगी यांनी मंगळवारीच आर्यनसाठी युक्तिवाद केला. त्यानंतर अरबाज मर्चंट आणि मूनमून धामेचा या दोघांच्या वकिलांनी युक्तिवाद केले. आज एनसीबीच्या वकिलांनी आपले म्हणणे मांडले आणि त्यानंतर रोहतगी यांचा प्रत्युत्तरादाखल युक्तिवाद सुरू असतानाच हायकोर्टाने तिन्ही अर्ज मान्य केले व जामीन दिला. हा जामीनदिलासा मिळाल्यानंतर रोहतगी व मानेशिंदे यांनी माध्यमांकडे प्रतिक्रिया दिली. वाचा: माझ्यासाठी ही एक नियमित केस होती. कधी विजय होतो तर कधी पराभव पदरी पडतो, हे सुरूच असतं. आज आर्यनला जामीन मिळाला, याचं मला जास्त समाधान आहे, अशी प्रतिक्रिया रोहतगी यांनी दिली. जामीन आदेशाची प्रत उद्या उपलब्ध होणार आहे. त्यानंतर बाकीची प्रक्रिया होऊन बहुदा उद्याच किंवा फारतर परवापर्यंत आर्यनची कोठडीतून सुटका होईल, असेही रोहतगी यांनी नमूद केले. ...आणि सत्याचा विजय झाला: मानेशिंदे 'आर्यन खानला २ ऑक्टोबर रोजी ताब्यात घेण्यात आले आणि ३ ऑक्टोबरला अटक करण्यात आली. तेव्हापासून त्याच्याविरोधात कोणताही पुरावा नव्हता. त्याच्याकडून कोणतेही अमलीपदार्थ हस्तगत केले नाही, त्याने त्याचे सेवन केले नाही किंवा त्याचा कटात सहभाग असल्याचाही पुरावा नाही. अखेर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी आर्यनला जामीन मंजूर केला आणि सत्याचा विजय झाला', अशी प्रतिक्रिया सतीश मानेशिंदे यांनी दिली. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: