आम्ही देश बदलण्यासाठी सरकारमध्ये आहोत, सरकार वाचवण्यासाठी नाही, अमित शहा यांचे वक्तव्य..

October 11, 2021 , 0 Comments

नवी दिल्ली । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजकीय जीवनाबद्दल नुकतीच अमित शहा यांनी माहिती दिली. शहा यांनी सरकारी वृत्तवाहिनी संसद टीव्हीला विशेष मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. यावेळी त्यांनी मोदींवर स्तुतीसुमने उधळली आहेत. नरेंद्र मोदी धोका पत्करून निर्णय घेतात, हे सत्य आहे असे वक्तव्य अमित शहा यांनी केले आहे.

शहा म्हणाले, आम्ही देश बदलण्यासाठी सरकारमध्ये आलो आहोत. सरकार वाचवण्यासाठी सरकारमध्ये नाही आलो. आमचे लक्ष देशात बदल घडवून आणायचा आहे. देशातील लोकांसाठी अनेक कामे करायची आहेत. तसेच त्यांच्या हिताचे निर्णय घ्यायचे आहेत.

१३० कोटी भारतीयांना जगातल्या सर्वात सन्माजनक जागी पोहोचवायचे आहे. जे वर्षानुवर्षे इथेच पडून आहेत. आपला युवा वर्ग पश्चिमेकडील देशांकडे नसता गेला जर हे निर्णय झाले असते. पण ते आता होत आहे, असे अमित शाह यांनी म्हटले आहे.

राजकारण नेते धोका पत्करून निर्णय घेत नाहीत, पंतप्रधान मोदी मात्र जिद्दीने निर्णय घेतात. असे विचारल्यानंतर अमित शहा यांनी पण हट्टीपणा हा शब्द बरोबर नाही, असे म्हटले आहे. ते जोखीम पत्करुन निर्णय घेतात हे बरोबर आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी अमित शहा यांनी मोदींबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले, मोदींचे आयुष्य सार्वजनिक आहे. त्यांना प्रशासनाचे बारकावे समजले आहेत. सुरुवातीला गुजरातमध्ये भाजपाची स्थिती वाईट होती. तिथे मोदींनी भाजपला उभे केले, असेही ते म्हणाले.

या मुलाखतीत अमित शहा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. शहा यांनी देखील याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या. गुजरातसह देशातील भाजपच्या परिस्थितीचा आढावा त्यांनी यावेळी सांगितला. तसेच अनेक मोठ्या निर्णयांवर भाष्य केले.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: