क्रूरतेचा कळस! आधी आईला ओम नमः शिवाय’ म्हणायलं सांगितलं, डोळे मिटताच विहिरीत ढकललं

October 11, 2021 , 0 Comments

भोपाळ। जन्माला आल्यापासून आईवडिल हे प्रत्येकाचे सर्वस्व असतात. आईवडिलांनशिवाय कोणत्याच घराला शोभा नसते. यापैकी कोणीही एक नसेल तरी संपूर्ण कुटुंब ढासळून जाते. कारण आई वडील हे घराचे कर्ते असतात. आपल्या मुलांची स्वप्न पूर्ण व्हावीत. तसेच त्यांना तीन वेळेचं अन्न पोटभर खाता यावं यासाठी ते दिवसरात्र मेहनत करत असतात.

जोपर्यंत मुलं स्वतःच्या पायावर भक्कम उभे राहत नाही तोपर्यंत आई वडील त्यांना फुलाप्रमाणे जपतात. मात्र एकदा मुलं स्वतःच्या पायावर उभी राहिली की बरीचशी मुलं ही आईवडिलांना विसरतात. किंवा त्यांना सोडून जातात. त्यांच्याशी क्रूरपणे वागतात. असाच काहीसा लज्जास्पद प्रकार भोपाळ मधून समोर आला आहे.

आपल्या लग्नासाठी आईने पैसे देण्यास नकार दिल्याने मुलाने चक्क आईला विहिरीत ढकलले आहे. लगेच घडलेला प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. ही घटना मध्यप्रदेशातील रतलामधील आहे. रतलाममध्ये राहणाऱ्या कलाबाई हा दिव्यांग आहेत. व त्यांना एक 22 वर्षांचा मुलगा आहे.

पुष्कर अस या मुलाचे नाव असून त्याला लग्न करायची इच्छा आहे. पुष्कर बऱ्याच दिवसापासून लग्न जमवायचा प्रयत्न करत आहे. आपल्याला लग्न करायचं असून त्यासाठी 5 हजार रुपयांची गरज असल्याचं त्यानं आई म्हणजेच कलाबाईंना सांगितलं. कलाबाईंकडे पैसे नसल्याचे सांगितले.

मात्र याचा राग मनात धरून पुष्करनं आईला शिक्षा देण्याचे मनात ठरवले. व त्यानुसार त्याने प्लॅन बनवला. त्यानंतर पुष्कर याने सर्व अडचणी दूर होण्यासाठी आपल्याकडे एक उपाय असल्याचं आईला सांगितले. भाबड्या आईचा आपल्या मुलावर पूर्ण विश्वास असल्याने तिने देखील त्याच ऐकलं.

पुष्कर याने आईला हातात नारळ घेऊन एका विहिरीच्या काठावर उभं राहायचं, डोळे मिटून ‘ओम नमः शिवाय’ म्हणायचं आणि नारळ विहिरीत फेकून द्यायचा, असं त्याने आईला सांगितलं. आईने मंत्र म्हणण्यासाठी विहिरीच्या काठावर उभं राहत डोळे मिटले. त्यानंतर पुष्करनं पाठिमागून जोरदार धक्का देत आईला विहिरीत ढकललं.

आईच नशीब ताठ असल्याने सुदैवाने मोटारीची वायर हाताला लागल्यामुळे कलाबाई विहिरीत बुडण्यापासून वाचल्या. व त्यानंतर शेजाऱ्यांनी त्यांना बाहेर काढले. व पोलिसांना कळवले. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार
लोकांच्या आग्रहानंतर कलाबाई यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली असली तरी आपल्या मुलाला कोणताही त्रास होऊ नये यासाठी शिक्षा झाल्यास तक्रार मागे घेणार असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या

अनेक वर्षांपासून ‘हा’ तरुण शोधतोय Virgin बायको, अटी ऐकून मुली देतात नकार..

‘एक नेते उठले आणि काय भाषण केले विचारूच नका, मग मुख्यमंत्र्यांनी पार बाभळीचीच उपमा दिली’  

आर्यनच्या काळजीने शाहरूख पूर्णपणे कोलमडलाय! ना झोपतोय, ना जेवतोय; जवळच्या व्यक्तीने सांगितले हाल

आर्यनच्या काळजीने शाहरूख पूर्णपणे कोलमडलाय! ना झोपतोय, ना जेवतोय; जवळच्या व्यक्तीने सांगितले हाल


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: