दुख:द! वाढदिवसाच्या दिवशीच वडिलांच्या प्रतिमेला हार घालताना माजी आमदाराचे हार्ट अटॅकने निधन

October 03, 2021 , 0 Comments

तामिळनाडूतील द्रमुकचे माजी आमदार वीरपंडी ए राजा यांचे शनिवारी निधन झाले. आज त्यांचा 59 वा वाढदिवस होता. सालेम येथे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांचे दिवंगत वडील आणि माजी मंत्री वीरपंडी ए अरुमुगम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना त्यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली आहेत. वडिलांच्या चित्राला माल्यार्पण करताना राजा बेहोश झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. राजा 2006 मध्ये वीरपंडी येथून तामिळनाडू विधानसभेवर निवडून आले होते.

वीरपंडी ए राजा हे सालेम जिल्ह्यातील पक्ष निवडणूक समितीचे सचिव होते. 1982 मध्ये द्रमुकमध्ये सामील झाल्यापासून ते अनेक पदांवर होते. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन, मंत्री पालिनिवेल थिआगराजन, के एन नेहरू, पोनमुडी आणि इतर मंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

स्टालिन यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या अशा अचानक जाण्याने त्यांच्या कुटूंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. ते एक खुप चांगले नेते होते असे त्यांच्या सहकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या पक्षात त्यांच्या जाण्याने खुप हळहळ व्यक्त होत आहे. राजकारणातील अनेक नेत्यांसोबत त्यांची खुप जवळची मैत्री होती. आपल्या वडिलांच्या प्रतिमेला हार घालताना त्यांना हार्ड अटॅक आला आणि त्यांची प्राणज्योत मावळली.

मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली
द्रमुकच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते एमके स्टालिन आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी माजी वीरपंडी ए राजा यांना श्रद्धांजली वाहिली. स्टालिन यांनी त्यांच्या कुटूबीयांना भेटून त्यांचे सांत्वन केले.

महत्वाच्या बातम्या
“किरीट सोमय्या ही मुर्ख व्यक्ती आहे, केंद्रातली सत्ता गेली तर परदेशात पळून जाण्याची वेळ येईल”
VIDEO: नागाला जंगलात सोडण्यासाठी जात होता सर्पमित्र, लोकांच्या हट्टापायी बाहेर काढला नाग अन्…
येडा की खुळा! युवकाने थेट कुकरशी केले लग्न, नंतर हे कारण सांगत घेतला त्याच्याशी घटस्फोट
येडा की खुळा! युवकाने थेट कुकरशी केले लग्न, नंतर हे कारण सांगत घेतला त्याच्याशी घटस्फोट


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: