अनिल देशमुखांच्या घराची ९ तास झडती; अटक वॉरंटची चर्चा होती, पण...
नागपूर: केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने आज पुन्हा माजी गृहमंत्री व काँग्रेसचे नेते यांच्या सिव्हिल लाइन्समधील निवासस्थानावर छापा टाकला. पथकाने तब्बल नऊ तास निवासस्थाची झडती घेतली. या छाप्यानंतर कारवाईचे मोठे पाऊल उचलण्याची शक्यता आहे. ( ) वाचा: दिल्लीहून आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास आलेल्या सहा जणांच्या पथकाने सर्च वॉरंटसह देशमुखांच्या निवास्थानी छापा टाकला. यावेळी देशमुख यांच्या कुटुंबातील सदस्य घरी नव्हते. केवळ कर्मचारीच घरी होते. सहा जणांचे पथक घराची झडती घेत असतानाच नागपुरातील सीबीआयच्या तीन सदस्यांचे पथकही तेथे धडकले. नऊ जणांच्या या पथकाने नऊ तासांपर्यंत संपूर्ण निवासस्थानाची झडती घेतली. दुपारी ४ वाजताच्या सुमारास सीबीआयचे पथक निवास्थानाहून बाहेर निघाले. यावेळी पत्रकरांनी पथकातील सदस्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र काहीही सांगण्यास नकार देत पथक दोन वाहनांनी कार्यालयाकडे रवाना झाले. वाचा: दरम्यान, सीबीआय पथक अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुख यांच्या अटकेचे वॉरंट घेऊन आल्याची चर्चा शहरात पसरली. मात्र, सीबीआयकडे केवळ सर्च वॉरंटच होता, असा दावा अंतर्गत सूत्रांनी केला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांनी अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपयांची वसुली केल्याचा आरोप केल्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे गेले. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर तपास सुरू केला. सीबीआय, व सक्तवसुली संचालनालयाच्या पथकाने वेळोवेळी देशमुखांच्या निवास्थानी छापे टाकले. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: