ब्रेकिंग! फरार किरण गोसावी पुणे पोलिसांच्या ताब्यात, आता आर्यन खान प्रकरणाचा लागणार निकाल..

October 28, 2021 , 0 Comments

पुणे । आर्यन खान प्रकरणातील एनसीबीचा पंच असलेला फरार आरोपी के पी गोसावीला आज सकाळी पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामुळे आता या प्रकरणात अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. बुधवारी संध्याकाळी गोसावी पुणे पोलिसांना शरण येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.

मात्र कालपर्यंत तो शरण आला नाही. अखेर पुणे पोलिसांनी आज त्याला ताब्यात घेतले आहे. तसेच आजच त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. आता कोर्टात काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

याबाबत पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी किरण गोसावीला आम्ही ताब्यात घेतल्याची अधिकृत माहिती दिलेली आहे. पुण्यातील फरासखाना पोलिस स्टेशनकडून त्याच्या अटकेची कारवाई देखील होऊ शकते.

किरण गोसावी हा परदेशात नोकरी मिळवून देणाऱ्या के. पी. जी. ड्रीम्स रिक्रूटमेंट कंपनीचा मालक असल्याची माहिती आहे. के. पी. जी. ड्रीम्स कंपनीचं मुंबई आणि नवी मुंबईत कार्यालय आहे. बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात, खासगी गुप्तहेर अशीही के. पी. गोसावी याची ओळख आहे.

पुणे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस देखील बजावली होती. गेल्या काही दिवसांपासून पुणे पोलीस त्याच्या मागावर होते. किरण गोसावी याचा आर्यन खानबरोबरचा फोटो व्हायरल केल्यानंतर तो चर्चेत आला होता. यामुळे पोलीस त्याचा तपास करत होते.

त्यानंतर पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल असून त्या तो फरार असल्याचे समोर आले होते. अखेर त्याला आता ताब्यात घेतले आहे. आता पुढे काय काय खुलासे केले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: