पुराव्यांच्या छेडछाडीसाठी हॅकर मनिष भंगाळेला पाच लाखांची ऑफर, आर्यन खान प्रकरण नव्या वळणावर

October 28, 2021 , 0 Comments

मुंबई । सध्या मुंबई क्रुझ ड्रग्स प्रकरण चांगलेच चर्चेत आहे.आता आर्यन खान प्रकरणाचा तपास करणारे एनसीबी अधिकारी समीर वानखेडेच चौकशीच्या फेऱ्यात सापडले असताना, आता या प्रकरणात नवीन ट्विस्ट समोर आला आहे. आता हॅकर मनिष भंगाळे याने याप्रकरणी धक्कादायक माहिती दिली आहे.

त्याने पुराव्यांची छेडछाड करण्यासाठी पाच लाखांची ऑफर देण्यात आली होती, असा दावा केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यासाठी शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीचा सीडीआर काढण्यास त्याने सांगितले आहे.

ते म्हणाले, माझ्याकडे दोनजण आले होते. आलोक जैन आणि शैलेश चौधरी अशी त्यांची नावे होती. त्यांनी काही नंबर सांगितले. त्यातील एक नंबर त्यांच्या मोबाईलमध्ये पूजा ददलानी म्हणून सेव्ह होता. त्यांनी आपल्याकडे एक व्हाट्सअ‍ॅपचॅट आहे. ते मॉडीफाय करुन टाका, आम्ही जे कंटेट सांगू ते टाका, असे त्यांनी सांगितले, अशी माहिती दिली.

त्यांच्या मोबाईलमध्ये आर्यन खान व्हॉट्सअ‍ॅप चॅट या नावाने फाईल होती. त्यांनी प्रभाकर साईल नावाचे डमी सीमकार्ड काढून देण्यास सांगितले. यासाठी पाच लाख देऊ असेही सांगितले, असेही त्यांनी सांगितले यामुळे आता प्रकरण चांगलेच तापले आहे.

तसेच मुंबईत भरपूर काम देऊ, मोठमोठे केंद्रीय मंत्री आमच्या संपर्कात आहेत. तुमची लाईफ बनून जाईल, असेही त्यांना आश्वासन देण्यात आले होते. त्यांनी मला दहा हजार रुपये दिले. हा सगळा प्रकार मला विचित्र वाटला. याबाबत मी मुंबई पोलिस, केंद्रीय गृहमंत्रालय तसेच महाराष्ट्र गृहमंत्रालयाला माहिती दिली आहे.

यामुळे यामध्ये काही मंत्र्यांचा हस्तक्षेप आहे का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, आर्यन खानच्या ड्रग्ज खटल्यात अद्याप कोणालाही दिलासा मिळालेला नाही. त्यातच कारवाई करणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे विविध प्रकरणांमध्ये अकडल्याचे चित्र आहे.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: