समीर वानखेडेच आता अडकणार? आणखी एका साक्षीदाराची पलटी, कॉल रेकॉर्डही दाखवले

October 28, 2021 , 0 Comments

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या अनेक आरोपांनंतर NCB अधिकारी समीर वानखेडे अडचणीत आले आहेत. आता आणखी एका साक्षीदाराने पलटी मारली आहे. प्रभाकर साईल नंतर खारघर ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार शेखर कांबळे याने कोऱ्या कागदावर NCB च्या अधिकाऱ्यांनी आपल्या स्वाक्षरी घेतल्या, असा दावा केला आहे.

याबाबत एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी १० ते १२ कोऱ्या कागदांवर माझी स्वाक्षरी घेतली. नंतर तेच कागद पंचनाम्यासाठी वापरले, असे शेखर कांबळे यांनी सांगितले आहे. यामुळे आता अनेकजण पुढे येण्याची शक्यता आहे.

याबाबत समीर वानखेडेंनी आपल्याला कोऱ्या कागदावर स्वाक्षरी करायला सांगितली होती. काहीही होणार नाही, असे वानखेडेंनी आपल्याला आश्वासन दिले. त्याने WhatsApp कॉल रेकॉर्डही दाखवले आहे. यामुळे आता वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.

एका बाजूला अनेकजण वानखेडे यांच्या बाजूने आवाज उठवत आहेत, तर दुसरीकडे वानखेडे यांच्या विरोधात देखील अनेकजण बोलत आहेत. नवाब मलिक रोज पत्रकार परिषदेत अनेक गोष्टींचा खुलासा करत आहेत. यामुळे आता याची मोठी चर्चा सुरू आहे.

टीव्हीवर मी खारघर नायजेरियन प्रकरणाची बातमी बघितली. मला भिती वाटली. अनिल माने, आशिष रंजन आणि एनसीबी अधिकाऱ्यांचा मला फोन आला. ते या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यांनी याबाबत मला शांत बसण्यास सांगितले. याबाबत कॉल रेकॉर्ड देखील आहेत.

काल रात्री उशिरा एनसीबी अधिकारी अनिल माने यांनी मला फोन केला व कोणाकडेही याबद्दल सांगू नको, असे सांगितले, असेही शेखर कांबळे याने सांगितले आहे. यामुळे आता पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: