सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! कोरोनामुळे मृत्यु झालेल्या व्यक्तीच्या कुटूंबीयांना मिळणार ५० हजार

October 05, 2021 , 0 Comments

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांना 50 हजार रुपयांच्या भरपाईला सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. यामध्ये त्या नातेवाईकांचाही समावेश आहे, जे या साथीने ग्रस्त आहेत आणि त्यांनी कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर एक महिन्याच्या आत या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे.

23 सप्टेंबर रोजी झालेल्या अंतिम सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम आर शाह आणि न्यायमूर्ती ए एस बोपन्ना यांच्या खंडपीठाने या प्रकरणी आपला निर्णय कायम ठेवला होता. केंद्राने प्रतिज्ञापत्रात, प्रत्येक व्यक्तीच्या मृत्युनंतर 50,000 रुपये भरपाई निश्चित करण्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली होती.

न्यायालयाने केंद्र सरकारच्या प्रतिज्ञापत्रावर समाधान व्यक्त करताना म्हटले की, भारताने प्रतिकूल परिस्थितीत जे काम केले ते इतर कोणताही देश करू शकत नाही. असे सांगून न्यायालयाने केंद्र सरकारच्या कामांची स्तुती केली आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने अनेक लोकांना मदत होणार आहे. अनेक लोकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

केंद्राने न्यायालयाला सांगितले होते की, मदत कार्यात सामील असलेल्यांना एक्स-ग्रेशिया देखील दिला जाईल. सरकारने सांगितले की जर मृत्यू प्रमाणपत्रात मृत्यूचे कारण कोरोना असेल तर मृतांच्या नातेवाईकांनाही मदत दिली जाईल. केंद्र सरकारने स्पष्टपणे नमूद केले आहे की, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून कोरोनाग्रस्तांच्या कुटुंबीयांना एक्स-ग्रेशिया मदत दिली जाईल.

भरपाईच्या रकमेबाबत सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्या होत्या. केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टासमोर विविध याचिकांच्या सुनावणीपूर्वीच सांगितले होते की ते १० लाख रुपयांची भरपाई देऊ शकत नाही. तथापि, न्यायालयाने सरकारच्या या मुद्द्यालाही सहमती दर्शवली होती आणि यांच्या मधला एखादा उपाय शोधण्यास सांगितले होते.

महत्वाच्या बातम्या
खोटं बोलून पदं कशी मिळवायची यामध्ये रामदास कदमांना पीएचडी दिली पाहिजे- निलेश राणे
फेसबूक, इन्स्टाग्राम, व्हाट्सऍप झाले डाऊन, असे काय झाले की हे सोशल मिडीया प्लॅटफॉर्म्स झाले अचानक बंद?
आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदेंची एका दिवसाची फी ऐकून तुम्हालाही फुटेल घाम
आम्ही शिवसेना सोडली तेव्हा आमच्या तिघांमध्ये पहिलं नाव रामदास कदमांचं होतं, निलेश राणेंनी सांगितला किस्सा


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: