खोटं बोलून पदं कशी मिळवायची यामध्ये रामदास कदमांना पीएचडी दिली पाहिजे- निलेश राणे

October 05, 2021 , 0 Comments

अशी माहिती समोर आली होती की शिवसेना नेत्यानेच भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांना रसद पुरवली होती. हा आरोप मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी केला होता. यामध्ये वैभव खेडेकर यांनी माजी मंत्री रामदास कदम यांचे नाव उघडपणे घेतले होते. पण ही क्लिप खरी आहे का याची पुष्टी अद्याप करण्यात आलेली नव्हती.

त्यानंतर एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे आणि खळबळ माजली होती. ही ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर आता खरे काय आणि खोटे काय याचा प्रश्न अनेकांना पडला आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये परबांविरोधात जी ईडीने कारवाई केली त्यावर वाह वाह करताना कदम दिसत आहेत. पण त्यांनी ही क्लिप खोटी असल्याचे सांगितले होते. आता यावरून राजकारण तापलेले आहे आणि रामदास कदमांवर निलेश राणेंनी जोरदार टीका केली आहे.

निलेश राणेंनी रामदास कदमांचा जोरदास समाचार घेतला आहे. निलेश राणे म्हणाले आहेत की, रामदास कदम हे परत एकदा खोटे बोलले. संभाषणामध्ये आवाज त्यांचा आहे. जर तुम्ही ऑडिओ ऐकला तर तुम्हाला असं कुठेही वाटणार नाही की हे एडिट केलेलं आहे. तरी नेहमीप्रमाणे रामदास कदम हे खोटं बोलले.

खरंतर खोटं बोलून पदं कशी मिळवायची यामध्ये रामदास कदमांना पीएचडी दिली पाहिजे. मातोश्रीला एक वेगळं चित्र दाखवून रामदास कदम यांनी नेहमी शिवसेनेच्या विरोधातच काम केलं आहे. हे वेगळं सांगायची काही गरज नाही आणि शिवसैनिकांना ते माहिती आहे. सुर्यकांत दळवी साहेबांना जर तुम्ही विचारलं तर ते माझ्यापेक्षा चांगली उदाहरणं देतील की ते कसं पक्षाविरोधी काम करतात आणि विरोधकांना कसा फायदा करून देतात.

आम्ही जेव्हा शिवसेना सोडली त्यामध्ये आमच्या तिघांमध्ये पहिलं नाव रामदास कदम यांचं होतं. रामदास कदम मातोश्रीच्या बाहेर निघाले आणि त्यांना मातोश्रीतून फोन आला तेव्हा त्यांनी गाडी वळवली. त्यानंतर त्यांना विरोधी पक्षनेता हे पद मिळालं. नंतर त्यांना सातत्याने आमच्यावर टीका केली जसं काही मी त्यातला नाहीच.

असं काही चारित्र्य रामदास कदम यांचे आहे. तसं तर त्यांना चारित्र्यच नाही. आता तरी रामदास कदमांनी या वयात सुधरावं. आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवाच्या कृपेने खोटं बोलून इतकी पदे मिळवली. ठीक आहे झालं ते झालं पण आतातरी त्यांनी सुधारलं पाहिजे. किती भाजपचे नेते तुम्हाला भेटले यांची यादी आहे.

मी भेटलोच नाही मी बोलतच नाही हे खोटं आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. पण खोटं बोलताना तुमच्या चेहऱ्यावर हावभाव तसे असतात. सहज खोटं बोलता तुम्ही. आता तरी खोटं बोलू नका, राजकारणामधून तुमची रिटायरमेंट व्हायला आली आहे आतातरी खरं बोला, असं निलेश राणे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या
फेसबूक, इन्स्टाग्राम, व्हाट्सऍप झाले डाऊन, असे काय झाले की हे सोशल मिडीया प्लॅटफॉर्म्स झाले अचानक बंद?
शाहरूखचा आर्यनवर होता खुप धाक, मन्नतमध्ये राहताना पाळावे लागायचे कडक नियम
आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदेंची एका दिवसाची फी ऐकून तुम्हालाही फुटेल घाम
लखीमपूर हत्याकांड: प्रियांका गांधींसह काॅंग्रेसच्या बड्या नेत्यांना उत्तरप्रदेश पोलीसांकडून अटक


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: