आर्यन क्रुझ विकत घेऊ शकतो, तिथं ड्रग्ज का विकेल; वकील सतीश मानशिंदेंचा कोर्टात बाजू मांडत युक्तीवाद

October 05, 2021 , 0 Comments

मुंबई। बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज पार्टीतून अटक करण्यात आली आहे. ताब्यात घेतल्यानंतर रविवारी आर्यन खानला एक दिवसाची न्यायालयाने कोठडी सुनावली. व त्यानंतर (४ ऑक्टोबर) म्हणजेच सोमवारी पुन्हा एकदा न्यायालयात सुनावणी झाली.

यावेळी मानेशिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निवाड्यांचा आधार घेत युक्तीवाद केला आणि आर्यन खानच्या जामिनाची मागणी केली. आर्यन खानकडून वकील सतीश मानशिंदे यांनी बाजू मांडली.

तर दुसरीकडे, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह हे एनसीबीकडून बाजू मांडली. तर, आर्यन खानच्या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह व धक्कादायक फोटो स्वरूपातील माहिती आढळल्याचे समोर आल्याने, त्याच्या कोठडीत ११ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली गेली.

कोर्टामध्ये एनसीबीचे वकील आणि सतीश मानशिंदे यांच्यात प्रदीर्घ युक्तीवाद झाला. आर्यनला जामीन मिळावा यासाठी मानशिंदे यांनी आर्यनच्या एनसीबी कोठडीवर आक्षेप घेतही कोठडी का हवी आहे अशी त्यांनी विचारणा केली.

त्यावर एनसीबीच्या वकीलांनी सांगितले की, आर्यन खानची कस्टडी घेऊन त्याच्याकडून त्याला या पार्टीमध्ये का बोलवण्यात होते यासह अन्य काही गोष्टीं जाणून घ्यायच्या आहेत.

त्यावर सतीश मानशिंदे यांनी सांगितले की, ‘आर्यन खानला क्रुझववर जाऊन ड्रग्ज विकण्याची अजिबात गरज नाही. तो या क्रुझवर का गेला होता याच्याशी एनसीबीचे काहीही देणेघेणे नाही. आर्यनला वाटले तर तो संपूर्ण क्रुझ खरेदी करू शकतो…’ असं मानशिंदे म्हणाले.

मानेशिंदे यांनी आर्यन खानचा बचाव करताना रिया चक्रवर्तीला जामीन देताना न्यायालयाने दिलेला निकालही वाचून दाखवला. तसेच एनडीपीएस कायद्यानुसार जामीन आणि अजामीन काय यावर युक्तीवाद केला. सर्वोच्च न्यायालयाने अजामीनपात्र गुन्ह्यासाठी जामीन दिल्याचंही त्यांनी न्यायालयात सांगितलं.

याप्रमाणे या न्यायालयाला देखील अजामीनपात्र गुन्ह्यात जामीन देण्याचा अधिकार आहे, असंही त्यांनी नमूद केलं. एनसीबीला जी चौकशी करायची होती ती करुन झालीय. आर्यन खानने त्यांना पूर्ण सहकार्य केलंय आणि ते देखील त्याच्याशी व्यवस्थित वागलेत.

त्याने चांगलं वर्तन केलंय आणि व्हॉट्सअप चॅट डिलिट केलेली नाही. कोणत्याही आधाराशिवाय केवळ फोनवरील चॅटिंगला महत्त्व नाही. त्यामुळे कोठडीची गरज नाही,” असा युक्तीवाद मानेशिंदे यांनी केला आहे.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: