कारवाई करत असताना असे हल्ले होत राहतात, पण मी घाबरणार नाही मी माझे कर्तव्य पार पाडणार- कल्पिता पिंगळे

September 01, 2021 , 0 Comments

ठाण्यात फेरीवाल्यांवर कारवाई करत असताना एक धक्कादायक घटना घडली आहे. एका भाजीविक्रेत्याने थेट पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांवरच हल्ला केला आहे. या हल्ल्यात आयुक्तांची बोटं तुटली आहे, त्यामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे.

या हल्ल्यात भाजीविक्रेत्याने सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंगळे यांची दोन बोटं छाटली गेली आहे. त्यानंतर त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. आता त्यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला आहे.

आम्ही अनाधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी पोहचलो होतो. तेव्हा एकाने माझ्या थोबाडीत मारली. त्यानंतर मी गाडीत बसले तेव्हा बोटं तुटल्याचं कळालं, खुप त्रास होत होता. हल्ले झाले तरी मी माझे कर्तव्य पार पाडत राहणार, असे कल्पिता पिंगळे यांनी म्हटले आहे.

आम्ही कारवाई करण्यासाठी त्या ठिकाणी गेलो होतो. त्याठिकाणी पालिकेचे कर्मचारी हजर होते. त्यावेळी मी गाडीतून उतरले, तेव्हा अचानक माझ्यावर हल्ला झाला. माझ्या थोबाडीत मारली त्यामुळे मला काय झाले हे सुचलेच नाही. मी जेव्हा गाडीत बसले तेव्हा माझी बोटं तुटली हे लक्षात आलं. खुप रक्त वाहत होतं खुप त्रास होता, असे कल्पिता पिंगळे यांनी म्हटले आहे.

आम्ही कर्तव्यावर असताना अशा प्रकारचा हल्ला केला जातो, त्यामुळे खुप वाईट वाटले. पण अशा हल्ल्यांनी मी घाबरणार नाही. कासारवडवली येथे फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडी होत असते. मी बरी झाले की पुन्हा माझं काम करणार, अशा गोष्टींना घाबरणार नाही, असेही पिंगळे यांनी सांगितले आहे.

ठाणे महापालिकेकडून अनाधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाईची मोहिम काढली आहे. आज संध्याकाळी माजिवाडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंगळे यांच्यासोबतच त्यांच्या पथकाने कासारवडवली येथील मार्केटवर कारवाई केली होती. त्यावेळी एका फेरीवाल्याने कल्पिता पिंगळे यांच्यावर हल्ला केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

मुकेश अंबानी यांनी घेतला मोठा निर्णय; आता देशाला चीनवर अवलंबून राहावे लागणार नाही
पती ८ वर्षांनी मोठा म्हणून दिरासोबत गेली पळून; त्यानंतर दिराने महिलेसोबत केलं ‘हे’ भयानक कृत्य
इंडियन आयडल ११ चा विजेता सनी हिंदूस्तानीची लव्हस्टोरी आहे खुपच फिल्मी; वाचा त्यांची इंटरेस्टींग लव्हस्टोरी


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: