मुकेश अंबानी यांनी घेतला मोठा निर्णय; आता देशाला चीनवर अवलंबून राहावे लागणार नाही

September 01, 2021 , 0 Comments

रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी सोलर एनर्जीच्या प्रोजेक्टवर काम करण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजने युरोपची सोलर पॅनल कंपनी बनवणारी सर्वात मोठी कंपनी आरईसी ग्रुपला खरेदी करणार आहे.

या कंपनीसाठी रिलायन्स इंडस्ट्रीज चायना नॅशनल केमिकल कॉर्पशी चर्चा झाली असून ही कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज १ ते १.२ बिलियन डॉलरमध्ये विकत घेणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता सोलर पॅनलसाठी भारताला चीनवर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही.

रिलायन्स इंडस्ट्रीजने नुकताच ग्रीन एनर्जी क्षेत्रामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ही कंपनी विकत घेण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज ५० ते ६० कोटी डॉलरचा फंड जमा करण्यासाठी जगभरातील बँकांसोबच चर्चा करत आहे.

सध्या संपुर्ण जग हे सोलर एनर्जीसाठी चीनवर अवलंबून आहे, त्यामुळे अनेक देशांना अडचणी येत आहे. त्यासाठी आता भारत आणि अमेरिकासारखे मोठे देश स्थानिक कंपन्यांना प्रोत्साहन देताना दिसत आहे.

२०१९ मध्ये, जेव्हा सोलर पॅनेल तयार करायचे होते, तेव्हा पोलिसीलिकॉन मोठ्या प्रमाणात चीनमधून आणण्यात आले होते. पण आता रिन्यू पॉवर, अदानी ग्रुप आणि रिलायन्स इंडस्ट्रीजने सोलर पॅनेलचे मोठे उत्पादन प्रोजेक्ट जाहीर केले आहे.

सध्या, देशाची सोलर सेल बनवण्याची क्षमता दरवर्षी सुमारे 3 जीडब्ल्यु आहे, पण 280 जीडब्ल्युचे सोलर एनर्जीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी हे अपुरे आहे. त्यामुळे रिलायन्स आणि आरईसी यांच्यातील कराराबाबत लवकरच घोषणा करण्यात येणार आहे. पण रिलायन्स इंडस्ट्रीजने या प्रकरणावर कोणतीही अधिकृतपणे प्रतिक्रिया दिली नाही.

महत्वाच्या बातम्या-

पती ८ वर्षांनी मोठा म्हणून दिरासोबत गेली पळून; त्यानंतर दिराने महिलेसोबत केलं ‘हे’ भयानक कृत्य
इंडियन आयडल ११ चा विजेता सनी हिंदूस्तानीची लव्हस्टोरी आहे खुपच फिल्मी; वाचा त्यांची इंटरेस्टींग लव्हस्टोरी
धक्कादायक! परळीच्या बड्या नेत्याच्या मुलाने दारु पिऊन गाडी चालवत तरुणाला चिरडले; तरुणाचा जागीच मृत्यु


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: