मोठी बातमी! धनंजय मुंडे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; करुणा मुंडेंच्या गंभीर आरोपांनी महाराष्ट्र हादरला

September 04, 2021 , 0 Comments

काही महिन्यांपूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकलेले सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे पुन्हा एकदा वादात अडकण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यातील वाद आता पुन्हा उफाळून येत असल्याची चिन्हे समोर येत आहे.

करुणा मुंडे यांनी आज फेसबूक लाईव्ह केले असून त्या आता परळीत जाऊन पत्रकार परिषद घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच या पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांच्यावरील सर्व आरोप सिद्ध करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

मी सीबीआयकडे माझ्या पतीचे कॉल रेकॉर्ड, व्हॉट्सऍप चॅट या सर्वांची सर्व माहिती देणार आहे. आज २५ वर्षानंतर माझ्यासोबत अशाप्रकारचं कृत्य केलं जात आहे. माझ्या मुलांना बंद करुन ठेवलं गेलं. राक्षस, नीच लोकंही कोणासोबत असे कोणासोबत वागत नाही, असे करुणा मुंडे यांनी म्हटले आहे.

पंकजा मुंडे यांच्या विरोधातही काही षड्ययंत्र केले जात आहे का? यावरही हेही मी माध्यमांना सांगणार आहे. माझी आईसांगत होती एकवेळ कुत्रा पाळ पण धोकेबाज आणि घाणेरडी माणसं नको पाळू. मी तिचं ऐकलं नाही, म्हणून भोगत आहे, असेही करुणा मुंडे यांनी म्हटले आहे.

माझ्या नवऱ्याने मला अनेक नेत्यांच्या गोष्टी सांगितल्या आहे. अजितदादांच्याही अनेक गोष्टी त्यांनी मला सांगितल्या आहे, असेही करुणा मुंडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

तसेच माझ्यासोबत ७-८ महिन्यांपासून जे काही सुरु आहे, ते सर्व सांगण्यासाठी मी परळीत रविवारी १२ वाजता जाणार आहे. मला खुप वेळा धमकावलं गेलं आहे. पण आता माझ्या हाती अनेक गोष्टी लागल्या आहे. मी त्या सोशल मीडियावर पोस्ट करणार पण तेवढ्यात मला माझ्या मुलीच्या वयाच्या एका तरुणीचा फोन आला आणि मला धमकावले. पण आता मी तिला नाही घाबरणार, असेही करुणा मुंडे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

VIDEO: म्हशीवर हल्ला केल्याने चवताळला रेडा: म्हशीला वाचवण्यासाठी सिंहांना शिंगाने उचलून फेकले
दीड महिन्यांपासून सायकवरच शोधत होता बेपत्ता झालेल्या पत्नीला; भेटल्यानंतर पत्नीची अवस्था बघून बसला धक्का
त्याने मला फसवलं त्यात माझ्या बाळाची काय चुक? त्याने कोणाकडे पाहून जगायचं? अक्षय बोऱ्हाडेच्या बायकोची आर्त हाक


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: