दारू पिऊन मनोरूग्णांना मारहाण करून गायब करतो, अक्षय बोऱ्हाडेच्या पत्नीने खरा चेहरा आणला समोर

September 03, 2021 , 0 Comments

गेल्या काही दिवसांपासून जुन्नर येतील शिरोली बुद्रुकचा अक्षय बोऱ्हाडे चर्चेत आहे. समाजसेवक अशी त्याची सोशल मीडियावर ओळख आहे. पण तो आता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्याचे अनेक कारनामे आता उघड झाले आहेत. यामुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.

त्याला खंडणी मागितल्याप्रकरणी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. असे असताना आता शिवसेनेकडून त्याने फेसबुक लाईव्ह दरम्यान केलेल्या वक्तव्या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी शिवसेना जुन्नर शहर प्रमुख चंद्रकांत डोके यांनी पोलिसांना निवेदन दिले आहे.

यामध्ये अक्षय बोऱ्हाडे हा जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, जुन्नर नगरपालिका या विषयांवर अत्यंत बेजबाबदारपणे टीका करत असल्याचे म्हटले आहे. फेसबुक लाइव्हमध्ये त्याने आक्षेपार्ह विधाने केली आहेत. यामध्ये नगराध्यक्ष यांची प्रतिमा जाणीवपूर्वक मलिन केली जात असल्याचे म्हटले आहे.

यामुळे त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान आता त्याच्या पत्नीनेही त्याचे सगळे कारनामे उघड केले आहेत. त्याच्या पत्नीने अनेक धक्कादायक खुलासे केले आहे. त्याची पत्नी रूपाली बोऱ्हाडे हिने सुरूवातीपासूनचा सगळा घटनाक्रम सांगितला आहे.

त्याची पत्नी म्हणाली आहे की, माझी फसवणूक झाली आहे. माझ्यावर खुप वर्षे अत्याचार झाला आहे. तिची आणि अक्षयची ओळख फेसबूकवरून झाली होती. तिने त्याचा एक व्हिडीओ पाहिला होता ज्यामध्ये अक्षय रस्त्यावरील एका अपंग व्यक्तीला मदत करत होता.

मला त्याचा खुप अभिमान वाटला की जुन्ना तालुक्यातील एक मुलगा एवढं चांगल काम करतोय. मी त्याला मेसेज केला होता की अशी खुप लोक जुन्नर स्टेशनवर आहेत मला पण तुमच्या ग्रुपला ऍड करा मलापण असे चांगले काम करायला आवडेल.

तुम्ही त्या लोकांना घेऊन जा आणि त्यांचेपण संगोपण करा असे मी त्याला मेसेजद्वारे सांगितले होते. तिकडून त्याचा मेसेज आला की मला तुमचा व्हॉट्स नंबर पाठवा आणि त्या अपंग व्यक्तींचा फोटो पाठवा मी त्यांना येऊन घेऊन जाईल. त्यानंतर मी त्याला फोटो पाठवले.

तर तो म्हणाला की माझं आता तर तिकडे येणे नाहीये जेव्हा मी तिकडे येईल तेव्हा त्यांना मी घेऊन जाईल. तर मी त्याला बोलले ठीक आहे चालेल. पण त्यानंतर तो मला रोज गुड नाईट आणि गुड मॉर्निंगचे मेसेज पाठवायला लागला. मलाही तो चांगला वाटला कारण तो महाराजांच्या नावाने चांगलं काम करत होता.

मी त्याच्याशी बोलत होते. ते झाल्यानंतर चार पाच दिवसातच त्याने मला प्रोपोज केलं. तेव्हा मी त्याला सांगितलं मला माझ्या करिअरकडे लक्ष द्यायचे आहे. तर तो मला म्हणाला की ठीक आहे तुला जे करायचं आहे ते कर मी लग्नानंतर तुला सगळं शिकवेण.

त्याच्या आईशीही मी कित्येकवेळा बोलले होते. त्याच्या घरीही त्याने माझ्याबद्दल सांगितले होते. मलाही त्याचे आई वडील त्यावेळी चांगले वाटले होते. तरीही मी त्याला लगेच होकार दिला नव्हता. त्यानंतर आमचं दोन ते तीन महिने फक्त फोनवर बोलणं होत होतं.

त्याच्यानंतर त्याने मला जुन्नरला कॉलेजला ऍडमिशन घ्यायला लावलं. त्यानंतर आमचं भेटणं बोलणं वाढलं. मी त्याच्या बोलण्यात फसत गेले. माझ्याकडून चुक झाली. आमच्या मैत्रीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले. त्यानंतर मी त्याला लग्नाला विचारले तर त्याने मला लग्नासाठी नकार दिला.

त्याने माझ्यासोबत रिलेशन ठेवलं आणि नंतर मला लग्नासाठी नकार दिला. त्यानंतर मी खुप डिप्रेशनमध्ये गेले होते आणि मी औषधही पिले होते. त्यावेळी तो मला म्हणाला होता की तुला जे करायचंय ते तु कर. त्याला वाटलं मी खोटं बोलते.

जेव्हा त्याला कळालं मी हॉस्पिटलमध्ये आहे तेव्हा तो मला भेटायला पुण्याला आला आणि त्याने मला लग्नासाठी होकार दिला. त्यानंतर २९ डिसेंबर २०१७ ला त्याने आळंदी येथे माझ्यासोबत लग्न केलं होतं. फक्त लोकांना दाखवण्यासाठी त्याने पुन्हा ३० डिसेंबरला जुन्नर येथे शिवनेरी किल्ल्यावर महाराजांच्या पुतळ्यासमोर लग्न केले आणि फेसबूक लाईव्हही केले.

मी जेव्हा सासरी शिरोली येथे गेले तेव्हा सुरूवातीला मला चांगली वागणूक मिळाली पण नंतर तो दारू पिऊन येऊ लागला. आमच्यात खुप भांडणे होऊ लागली आणि मला अक्षयची सगळी बाहेरची लफडी समजली. मी याबाबत त्याला विचारले तर त्याने मला मारहाण केली.

मला त्याने माहेरला पाठवलं तेव्हा त्याला आळेफाटा प्रकरणामध्ये अटक झाली होती. तेथून सुटल्यानंतर तो पुन्हा मला गोड बोलून सासरी घेऊन आला. शिवऋण प्रतिष्ठाण हा फक्त त्याचा उत्पादनाचा स्त्रोत आहे. अक्षयने अनेक मनोरूग्णांना गायब केलं आहे.

२१ मे २०२० रोजी जेव्हा मला मुलगा झाला तेव्हा अक्षय मला पाहायलाही आला नाही. त्यावेळी मी माहेरी गेले होते तेव्हा मला एका मुलीचा फोन आला आणि तिने मला अक्षयबाबत माहिती दिली. अक्षय मला पुन्हा घरी घेऊन आला. माझा पती काहीही काम करत नाही आणि प्रतिष्ठानच्या पैशांचा चैनीसाठी वापर करतो.

अक्षयच्या ड्रायव्हरने मला सगळी हकीकत सांगितली आहे. मी घरी नसताना तो मुलींना घरी आणतो त्यांच्यासोबत तारू पितो. याबाबत मी जेव्हा त्याला विचारले तर त्याने मला जीवे मारण्याची धमकी दिली. तो असेही म्हणाला की माझा आणि तुझ्या बाळाचा काहीही संबंध नाही, अशी धक्कादायक माहिती रूपालीनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या
तुमच्या घरात कोणाला पाय हलवण्याची सवय आहे? असेल तर तुम्ही ‘या’ गंभीर रोगाला बळी पडू शकता
‘या’ समाजात नवऱ्याला द्यावी लागते कौमार्य चाचणी; शक्ती परीक्षणासाठी नवरीच्या काकूसोबत बनवले जातात संबंध
‘या’ ७ अभिनेत्रींसोबत होते सिद्धार्थ शुक्लाचे प्रेमसंबंध, शेवटी शहनाज सोबतही कहाणीही अधूरीच राहीली
…तरच बैलगाडा शर्यत आयोजित केली जाऊ शकते; बैलगाडा शर्यतीवर उच्च न्यायालयाने दिला महत्वाचा निकाल


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: