मृत्यूच्या आधी सिद्धार्थ शुक्लाने केले होते ‘हे’ काम, वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी..

September 03, 2021 , 0 Comments

मुंबई । काल बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्लाचे अचानक निधन झाले. वयाच्या ४० व्या वर्षी सिद्धार्थने जगाचा निरोप घेतला आहे. टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सिद्धार्थ शुक्लाचे खूप चाहते होते. या दिवसांत तो त्याच्या कारकीर्दीच्या शिखरावर होता.

त्याने अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केले. टीव्ही सीरियल ‘बालिका वधू’ मधून सिद्धार्थ शुक्ला रातोरात सगळ्यांना माहिती झाला. सिद्धार्थ शुक्ला त्याच्या मृत्यूच्या ६ दिवस आधी मानवांच्या जीवनाबद्दल बोलला होता. यामुळे आता त्याची चर्चा सुरू आहे.

सिद्धार्थ शुक्लाने मृत्यूपूर्वी केवळ ६ दिवस आधी एक कृत्य केले. सिद्धार्थ शुक्लाला २७ ऑगस्ट रोजी एका व्यक्तीने टॅग केले आणि सांगितले की, सिद्धार्थ भटक्या कुत्र्यांसाठी मोहीम हाती घेत होता आणि तो प्राण्यांच्या भोजनाची पूर्ण व्यवस्था करत असे. त्या व्यक्तीने अभिनेत्याचे आभार मानले. सिद्धार्थने या व्यक्तीला उत्तरही दिले होते.

सिद्धार्थने प्रतिसादात लिहिले, ‘ज्या जगात मानवी जीवन इतके स्वस्त झाले आहे, ते पाहणे आनंददायी आहे. भटक्या कुत्र्यांबद्दल दया करा. सिद्धार्थ शुक्ला ट्विटरवर खूप सक्रिय होता, आणि सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांना उत्तरही देत ​​असे. त्याचे अनेक चाहते होते. सिद्धार्थ शुक्लाने याआधीही एका चाहत्याला जगात प्रेम पसरवण्याची विनंती केली होती. तो नेहमी आपल्या प्रियजनांना योग्य मार्ग दाखवायचा.

ज्यावेळी तो कुठेतरी दिसला, तरी तो त्याच्या चाहत्यांकडे विशेष लक्ष देत असे. सिद्धार्थ शुक्लाच्या चाहत्यांसाठी आणि कुटुंबीयांसाठी हा मोठा धक्का आहे. सिद्धार्थ पूर्णपणे निरोगी होता, त्याला व्यसन नव्हते, तो व्यायाम करायचा. बुधवारी रात्री सिद्धार्थ शुक्लाने काही औषध घेतले होते पण त्यानंतर तो उठू शकला नाही.

त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले. यामुळे सर्वांना एकच धक्का बसला. अनेकांनी त्याच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. अनेकांना यावर विश्वास देखील बसत नव्हता.

ताज्या बातम्या

तुमच्या घरात कोणाला पाय हलवण्याची सवय आहे? असेल तर तुम्ही ‘या’ गंभीर रोगाला बळी पडू शकता

…तरच बैलगाडा शर्यत आयोजित केली जाऊ शकते; बैलगाडा शर्यतीवर उच्च न्यायालयाने दिला महत्वाचा निकाल

मोठी बातमी! बैलगाडा शर्यतींना अखेर परवानगी; उच्च न्यायालयाने दिला महत्वाचा निकाल


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: